JOIN US
मराठी बातम्या / करिअर / दापोली कृषी विद्यापीठात 50 वर्षांत पहिल्यांदाच घडला, मिळाल्या महिला कुलगुरू!

दापोली कृषी विद्यापीठात 50 वर्षांत पहिल्यांदाच घडला, मिळाल्या महिला कुलगुरू!

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत 28 मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे…

जाहिरात

(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली, 26 मे : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव यांच्याकडे देण्यात आला आहे. कुलगुरूपदी उज्वला चक्रदेव यांची अतिरिक्त कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने दापोली कोकण कृषी विद्यापीठाला 50 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला कुलगुरू मिळणार आहे. येत्या 28 मे रोजी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर संजय सावंत सेवानिवृत्त होत असल्याने चक्रदेव यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. तसंच दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू निवडीची 28 मे रोजी पाच सदस्यांची मुलाखत निवड समिती समोर होणार आहे. या पाच सदस्यातून दापोली कोकण कृषी विद्यापीठाला कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूंची निवड होईपर्यंत चक्रदेव या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रति कुलगुरू असतील. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राज्यपाल रमेश बैस यांनी जाहीर केले आहे. (HSC Result 2023 : ज्या शाळेत वडील चालवतात टेम्पो, मुलगी त्याच शाळेत बनली Topper!) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत 28 मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उज्वला चक्रदेव यांची तात्पुरती वर्णी लागली आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उज्वला चक्रदेव यांची अतिरिक्त कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने दापोली कोकण कृषी विद्यापीठाला पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच महिला कुलगुरू मिळणार आहे.

उज्ज्वला चक्रदेव एस.एन.डी.टी महिला युनिव्हर्सिटी मुंबई येथे कुलगुरूपदी विराजमान आहेत. दोन्हीही विद्यापीठाचा पदभार काही दिवस त्या सांभाळणार आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्याने चक्रदेव यांची अतिरिक्त कुलगुरूपदी वर्णी लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या