JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / पावसाच्या पाण्यात कार बुडाली तर टेन्शन घेऊ नका, अशी मिळवा भरपाई!

पावसाच्या पाण्यात कार बुडाली तर टेन्शन घेऊ नका, अशी मिळवा भरपाई!

केवळ गाड्यांचा नाही, तर घर, दुकान, गोदाम, अंगणात ठेवलेलं सामान, इत्यादींचा विमा काढता येतो. त्याचबरोबर पाऊस, पुरात नुकसान झालेल्यांनाही इन्शुरन्स कंपनीद्वारे भरपाई मिळवता येते.

जाहिरात

आजच विमा काढून नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानापासून वाचा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंकित दुदानी, प्रतिनिधी चंदीगड, 12 जुलै : आपल्याकडे पावसाने जरा उसंत घेतली असली, तरी इतर राज्यांमध्ये मात्र पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढला आहे. अर्थातच पावसात डोकं वर काढणाऱ्या सर्व समस्या जाणवू लागल्या आहेत. पावसाचं पाणी तुंबलं की, केवळ झाडांचं आणि कच्च्या घरांचं नुकसान होतं असं नाही, तर लाखो रुपये खर्चून बांधलेल्या घरांचं, लाखोंच्या गाड्यांचंही नुकसान होतं. मग अशावेळी काय करावं? नुकसान भरपाईसाठी विमा काढावा. यासंदर्भातच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. माणसांप्रमाणे वस्तूंचाही विमा काढता येतो, हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहित असेल. त्याआधारे कोणत्याही वस्तूच्या नुकसानाची भरपाई मिळू शकते. याबाबत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापक संजय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ गाड्यांचा नाही, तर घर, दुकान, गोदाम, अंगणात ठेवलेलं सामान, इत्यादींचा विमा काढता येतो. त्याचबरोबर पाऊस, पुरात नुकसान झालेल्यांनाही या इन्शुरन्स कंपनीद्वारे भरपाई मिळवता येते. ‘आमच्याकडे आतापर्यंत 10 कोटी रुपयांच्या भरपाईसाठी लोकांनी विमा काढला आहे’, असं संजय जोशी यांनी सांगितलं.

‘कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान असो, भूकंपामुळे होणारं नुकसान असो, अपघातामुळे झालेलं नुकसान असो, एखाद्याचं वाहन वाहून गेलं किंवा खराब झालेलं असो, आम्ही ग्राहकांना पूर्ण नुकसान भरपाई देतो’, असंही संजय जोशी यांनी सांगितलं. त्यांनी नागरिकांना ‘आजच विमा काढून नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानापासून वाचा’, असं आवाहनही केलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्याने 57 व्या वर्षी केलं सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न; पत्नी आहे 25 वर्षांनी लहान PHOTOS त्याचबरोबर, ‘जर एखादी गाडी पाण्यात बुडाली, तर ती सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. क्रेनच्या सहाय्याने ती उचलून सुरक्षितस्थळी ना. अन्यथा आधी झालेल्या नुकसानात गाडी सुरू करण्याच्या प्रयत्नामुळे आणखी भर पडू शकते’, असंही संजय जोशी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या