नवी दिल्ली, 19 मार्च : तुम्ही स्वस्तात, कमी किमतीत चांगली स्कूटर (Buy New Scooter) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कमी बजेटमध्ये 40 हजारहून कमी किमतीत स्कूटर खरेदी करू शकता. कमी किमतीतील ही स्कूटर होंडा अॅक्टिव्हा 4G (Honda Activa 4G) आहे. ही स्कूटर सेकंड हँड सेगमेंट स्कूटर (Second Hand Scooter) आहे. बाइक्स 24 नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. नव्या कोऱ्या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 81,583 रुपये आहे. पण कमी बजेटमध्ये सेम गाडी तुम्ही खरेदी करू शकता.
बाइक्स (24 Bikes 24) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर दिल्लीच्या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. बाइक्स 24 वेबसाइटवर या सेकंड हँड स्कूटरची किंमत 38 हजार रुपये आहे. त्याशिवाय कंपनीने यावर 12 महिन्यांची वॉरंटीही दिली आहे.
वेबसाइटवर लिस्टेड माहितीनुसार, ही स्कूटर आतापर्यंत 70 हजार किलोमीटरपर्यंत चालली आहे. 2017 मध्ये ही Honda Activa 4G खरेदी करण्यात आली होती. ही गाडी दिल्ली डीएल 03 आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. वेबसाइटनेही याचा एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात हेटलाइट आणि टेल लाइट्ससह माहिती देण्यात आली आहे. या गाडीची बॅटरीही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्याशिवाय स्पीडोमीटरही चांगल्या कंडिशनमध्ये आहे.
Honda Activa 4G मध्ये 109.19 cc इंजिन देण्यात आलं आहे. हे 8.11 पीएस पॉवर आणि 9 nm टॉर्क जनरेट करतं. ही स्कूटर 60 किलोमीटर प्रति लीटरचं मायलेज देतं. यात ड्रम ब्रेक आणि ट्यूबलेस टायरचा वापर करण्यात आला आहे.