भारतात मागील काही वर्षात सेकंड हँड कारचं मार्केट तेजीत आहे. कोरोनापासून यात अधिकच वाढ झाली आहे. सेकंड हँड कार खरेदी करणं नव्या कारपेक्षा अधिक सोपं तसचं बजेटमध्येही ठरतं.
Maruti True Value, Mahindra First Choice, Car Dekho, Cars24 अशा साइट्सवर ग्राहकांना सर्टिफाइड सेकंड हँड कार्स मिळू शकतात. तसंच यावर वॉरंटीही मिळते. अनेक सेकंड हँड कार कंपन्या Used Cars वर योग्य डील देतात.
अशीच एक Maruti Suzuki Alto तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. Maruti True Value या साइटवर सेकंड हँड Alto उपलब्ध आहे. ही कार बहदूरगढमध्ये रजिस्टर्ड असून एकूण 90000 किमी चालली आहे. हे 2007 चं मॉडेल आहे. तसंच फर्स्ट ओनर कार आहे. या सिल्व्हर रंगाच्या Alto ची 49000 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या कारसाठीची अधिक माहिती कंपनीच्या साइटवर घेता येईल.
Maruti True Value वर Maruti Alto चं STD मॉडेलही उपलब्ध आहे. या सेकंड हँड कारची किंमत 85000 रुपये आहे. डार्क ग्रे रंगाची ही कार 85,808 किमी चालली आहे. हे मॉडेल 2007 चं आहे. तसंच ही सेकंड ओनर कार आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक True Value शी संपर्क करू शकतात.
सेकंड हँड कार खरेदी करताना ग्राहकांना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वात आधी कारचे सर्व पेपर्स नीट तपासणं गरजेचं आहे. त्याशिवाय मागील काही वर्षातील क्लेमदेखील ट्रॅक करा. पेपर्स खरे असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करा.
शक्य असल्यास एखादा जाणकार किंवा मॅकेनिकही सोबत ठेवू शकता. यामुळे कारचं इंजिन, इतर टेक्निकल डिटेल्स आणि समस्यांबाबतची माहिती स्पष्टपणे समोर येईल आणि फसवणुकीपासून बचाव होईल.