नवी दिल्ली, 18 मार्च : देशात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि एयर पॉल्यूशनमुळे आता ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी (Electric Vehicles) वाढते आहे. कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले नवे प्रोडक्ट्स लाँच करत आहेत. देशात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच केल्या आहेत. यात एथर एनर्जी (Ather 450X), बजाज चेतक (Bajaj Chetak), टीव्हीएस (TVS iQube) इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड सामिल आहेत. या स्कूटर्सची भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर Ather 450X, Bajaj Chetak आणि TVS iQube चा विचार करू शकता. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ग्राहकांना फेम-2 सब्सिडीअंतर्गत सब्सिडी देत आहे. तसंच पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत असल्याचं चित्र आहे.
काय आहे किंमत आहे फीचर्स - जानेवारी 2022 मध्ये आलेली Ather 450X स्कूटर सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे. या स्कूटरची किंमत 1.18 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप वेरिएंटची किंमत 1.38 लाख रुपये आहे. परंतु फेम-2 सब्सिडीमध्ये स्कूटरची किंमत कमी होते. Ather 450X बॅटरी 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी ताशी टॉप स्पीडपर्यंत पोहोचत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याला 7 इंची फुल डिजीटल टचस्क्रिन डिस्प्ले आहे. कंपनीने याला अँड्रॉइड ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टमवर बनवलं आहे. Ather 450X 2.9 kwh लिथियम बॅटरीसह असून ही स्कूटर एका चार्ज केल्यानंतर 116 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 3.35 तासांचा वेळ लागतो. TVS iQube स्कूटर सिंगल वेरिएंटमध्ये येते. याची किंमत 1.15 लाख रुपये आहे. TVS iQube स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 75 किलोमीटरपर्यंत चालते. ही स्कूटर 4.2 सेकंदात 0 ते 40 किमी ताशी स्पीड पकडू शकते. या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तासांचा वेळ लागू शकतो.
Bajaj Chetak दोन वेरिएंटमध्ये येते. अर्बनची किंमत 1 लाख रुपये आणि प्रीमियम वेरिएंटची किंमत 1.15 लाख रुपये आहे. Bajaj Chetak एका चार्ज केल्यानंतर 90 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. ईको मोडमध्ये बजाज चेतक 60 किलोमीटर ताशी स्पीड पकडू शकते. या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तासांचा वेळ लागतो