मुंबई, 16 मार्च : देशातील वाहनांचे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. याचाच भाग म्हणून आता ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल (Hydrogen based Fuel Cell Electric car) वर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई (Toyota Mirai) बुधवारी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. मिराई शब्दाचा जपानी भाषेत अर्थ भविष्य असा होतो त्यामुळे या गाडीला मिराई ते नाव देण्यात आले आहे. टोयोटाने भारतातील पहिले हायड्रोजन इंधन सेलवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन Mirai लाँच केले. या टोयोटा मिराई कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कारपेक्षा या वाहनाची रेंज जास्त आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये ही 600 किमी पर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये हायड्रोजनचे रुपांतर विजेमध्ये होते, ज्यामुळे इंजिनला शक्ती मिळते. यातून फक्त पाणी बाहेर टाकले जाते त्यामुळे ही कार पुर्णपणे पर्यावरण पूरक आहे. कारमध्ये ऑनबोर्ड वीज तयार होते, ज्यावर कार चालवली जाते. कारच्या मागील बाजूस 1.4 kWh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनापेक्षा 30 पट कमी आहे. एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरला जातो. इतक्या इंधनात ही कार 600 किमी प्रवास करते.
Delighted to launch the world's most advanced technology - developed Green Hydrogen Fuel Cell Electric Vehicle (FCEV) Toyota Mirai along with Union Minister Shri @HardeepSPuri ji, Union Minister Shri @RajKSinghIndia ji,... pic.twitter.com/teu8pm1l57
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 16, 2022
आता जगात अवकाशातून वस्तूंची डिलिव्हरी होणार! तंत्रज्ञान पाहून व्हाल चकित हायड्रोजन असल्याने धोका आहे का? हायड्रोजन हा धोकादायक वायू आहे. त्यामुळे याच्या सुरक्षेबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ शकतात. टोयोटा मिराईमध्ये तीन हायड्रोजन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. कारच्या आत सिलिंडर अशा प्रकारे ठेवले आहेत की सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. हे बुलेट प्रूफ सिलिंडर असून त्यामुळे याला कोणतेही धोका होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने कार पूर्णपणे सुरक्षित आहे. कारमध्ये सेन्सर बसवलेले आहेत जे कोणतीही अडचण आल्यास संपूर्ण सिस्टीम बंद करतात.

)







