'यूपीए सरकार होते तेव्हा कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज भाजपने करू दिलं नाही. मात्र सत्तेत आल्यावर...
औरंगाबाद, 13 नोव्हेंबर : वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेने **(Shiv Sena)**कडून औरंगाबाद (Aurangabad) मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढला जात आहे. या मोर्चापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, संजय राऊत यांनी म्हटलं, इंधनाचे दर 110, 120 रुपये करायचे आणि मग रुपया, सव्वा रुपया कमी करायचा. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी ढोल वाजवत फिरायचं की, महागाई कमी केली. ही इंधन दरातील कपात कधी केली? तर 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला तेव्हा हे दोन-पाच रुपये कमी केले. जर 50 रुपये पेट्रोल-डिझेलचे कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल. जनतेमध्ये तसं वातावरण आता निर्माण होत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांची आर्थिक कोंडी संजय राऊत पुढे म्हणाले, राज्य सरकारांची आर्थिक कोंडी केली जात आहे. जीएसटीचा परतावा दिला जात नाहीये. राज्य सरकारांना मदत केली जात नाहीयेत. विशेषत: जेथे भाजपशासित सरकार नाहीये तिथल्या सरकारला काम करु दिलं जात नाहीये. केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशिरपणे घुसवल्या जात आहेत आणि तेथील स्थानिक सरकार, नेत्यांवर जोरजबरदस्ती जुलुम सुरू केला जात आहे. वाचा : ‘कंगनाबेनचे डोके बधीर झालेय, त्याचे कारण NCB चे वानखेडेच शोधू शकतील’ शिवसेनेचा टोला महागाई, बेरोजगारीवर केंद्रीय मंत्री बोलत नाहीत या देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री हे महागाईवर बोलत नाहीत. वाढत्या बेरोजगारीवर बोलत नाहीत. आपल्या देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झाल्या आहेत. चीनकडून घुसखोरी सुरू आहे त्यावर कुणी बोलायला तयार नाहीये. आजचा शिवसेनेचा मोर्चा हा त्याविरोधात पडलेली एक ठिणगी आहे असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या महागाई विरोधातील मोर्चाला मनसेने विरोध दर्शवला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा कधीच लढण्यासाठी स्वत:चं हत्यार वापरत नाही. ते दुसऱ्याच्या खांद्यावर.. बर खांदे सुद्धा मजबुत नसतात त्यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरतो. कधी बॉम्ब फोडणार म्हणतात, कधी लवंगी फटाकाही फुटत नाही. कधी ईडी-सीबीआयच्या घोषणा करतात आणि तेथूनही काही मिळत नाही. हे सर्व भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरुन आम्हाला विरोध केला जात आहे. शिवसेना हा एक हत्ती आहे, कोण पाटीमागून भूंकतय याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला आहे. वाचा : इंधनाचे नवे दर जारी, या शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षाही कमी शिवसेनेच्या मोर्चाला मनसेचा विरोध शिवसेनेच्या या मोर्चाला आता मनसेने विरोध केला आहे. शहरातील पाणीपट्टी महागाई पाहता शिवसेनेला महागाई विरोधात मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकारी नाही अशी प्रतिक्रिया औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिलीय. मनसेच्या भूमिकेला उत्तर देत सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं, मनसे किंवा कुणीही आमच्या मोर्चाला विरोध करून दाखवावं.