मुंबई, 27 मे : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. व्यक्तीच्या जीवनात ग्रहांची स्थिती शुभ आणि अशुभ बदल घडवून आणते. जून महिन्यामध्ये पाच ग्रह राशी बदलतील. ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. मात्र, या काळात ग्रह आणि राशी बदल तीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ (June Grah Rashi Parivartan 2022) शकतात. जूनमध्ये या ग्रहांची बदलेल चाल- सर्वात अगोदर 3 जून रोजी, ग्रहांचा राजकुमार बुध वक्री अवस्थेतून वृषभ राशीत जाईल. यानंतर 5 जून रोजी शनिदेव कुंभ राशीत वक्री चाल करतील. यानंतर सूर्य, शुक्र आणि मंगळ देखील राशी बदलतील. जाणून घेऊया याचा कोणत्या राशींना फायदा होईल- वृषभ - जून महिना या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना लाभदायक ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. व्यवसायात मोठे सौदे निश्चित होऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कार्यशैलीत सुधारणा होईल. ऑफिसमध्ये तुम्हाला प्रशंसा मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. हे वाचा - उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या धनु - धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात लाभ होईल. नवीन करार अंतिम ठप्प्यात येऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला उधारीचे पैसे परत मिळू शकतात. तथापि, या महिन्यात डोळ्यांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. हे वाचा - तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी (या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)