JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / शेवटची संधी अन्यथा PM Kisan योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही; घरबसल्या करा eKYC

शेवटची संधी अन्यथा PM Kisan योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही; घरबसल्या करा eKYC

PM Kisan Yojana Next Installment: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही मदत शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) पुढील हप्ता लवकरच येत आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळतील. मात्र, हे दोन हजार रुपये मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. या कामाला उशीर झाला तर हे 2000 रुपये मिळणार नाहीत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपये मिळतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वर्षभरात एकूण 6000 रुपये मिळतात. हे काम करणे आवश्यक आहे वास्तविक, पीएम किसानचा हप्ता मिळविण्यासाठी केवायसी (PK Kisan eKYC) करणे खूप महत्त्वाचे आहे. आता ई-केवायसी करण्यासाठी एक आठवडा शिल्लक आहे. त्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. ज्या लाभार्थींनी पीएम किसान अंतर्गत त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी ईकेवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा त्यांना 2000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. eKYC अनिवार्य विशेष म्हणजे, सरकारने सर्व PM किसान नोंदणीकृत शेतकर्‍यांना त्यांचे eKYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC ची अंतिम तारीख अनेक वेळा वाढवली आहे. दुसरीकडे, OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो. महागाईने कंबरडं मोडलंय? तज्ज्ञाकडून शिका आर्थिक बजेट कसं बनवायचं! खर्चासोबत बचतही होईल केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला 12 वा हप्ता मिळवायचा असेल आणि eKYC पूर्ण करायचा असेल, तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1: अधिकृत वेबसाइट pmkisan.nic.in ला भेट द्या स्टेप 2: ‘शेतकरी कॉर्नर’ विभागात ’eKYC’ वर क्लिक करा. स्टेप 3: ‘OTP आधारित eKYC’ पर्यायाखाली तुमचा आधार क्रमांक टाका. स्टेप 4: ‘Search’ वर क्लिक करा. स्टेप 5: आता तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा. स्टेप 6: OTP प्रविष्ट करा. स्टेप 7: प्रविष्ट केलेल्या तपशीलांची यशस्वी पडताळणी केल्यानंतर EKYC पूर्ण केले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या