JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणतात शेतकऱ्यांनो पेट्रोल, डिझेलच्या गाड्या घेऊ नका, भविष्यात पेट्रोलशिवाय विमान चालेल

Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणतात शेतकऱ्यांनो पेट्रोल, डिझेलच्या गाड्या घेऊ नका, भविष्यात पेट्रोलशिवाय विमान चालेल

भारत (INDIA) हा साखर उत्पादनात (sugarcane production) मोठा उत्पादक बनत आहे यामुळे देशामध्ये साखरेला भाव (sugar rate) मिळाला पाहिजे. असे नितीन गडकरी म्हणाले

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 जून : भारत (INDIA) हा साखर उत्पादनात (sugarcane production) मोठा उत्पादक बनत आहे यामुळे देशामध्ये साखरेला भाव (sugar rate) मिळाला पाहिजे. दरम्यान देशातील उसाचे उत्पादन थांबवू सध्यातरी आपण थांबवू शकत नाही. दरम्यान यासह भारतातील इतर धान्य उत्पादन ही वाढले पाहीजे यामुळे भारतात निर्यात  वाढली पाहिजे आयात कमी झाले पाहिजे, त्यामुळे शेतकरी (farmer) सुखी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (minister nitin gadkari) म्हणाले. ते दौंड तालुक्यातील (daund tehsil) पाटेठाण या ठिकाणी असलेल्या श्रीनाथ साखर कारखान्याच्यावतीने उभारण्यात आलेल्या सीबीजी गॅस (CBG Gas) प्रकल्पाच्या उद्घाटनाला आले होते. तसेच कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत विनोद तावडे (vinod tavde) देखील होते.

गडकरी पुढे म्हणाले कि, भारतात सध्या पेट्रोल डिझेल १० लाख कोटी लिटर आयात करावे लागते. याला पर्याय आपण शोधला पाहिजे. यासाठी विविध  गाड्यांचा वापर करावा मी सध्या दिल्लीत हायड्रोजन गाडी वापरतो ती चालवण्यासाठी चांगली आहे. अशा अनेक गाड्या आपल्याला उपलब्ध होतात याचा वापर करावा. असेही ते म्हणाले. देशातील शेतकरी अन्नदाता आहे तो आता उर्जा दाता झाला पाहिजे अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हे ही वाचा :  Agnipath Scheme : ‘हा सैन्य दलाचा अपमान’, संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

संबंधित बातम्या

देशात ४५० करोड इथेनॉल निर्मिती होते. तसेच देशातील काही ठिकाणी बांबू पासून इथेनॉल निर्मिती होत आहे. याचबरोरबर काही दिवसांत काही दिवसात मिथेनोलपासून विमान चालणार आहे यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे यापुढे पेट्रोल, डिझेलची गाडी घेऊ नका  येणाऱ्या काळात इथेनॉलची कमी नाही, यामुळे पेट्रोल डिझेलची गाडी घेताना विचार करावा असेही गडकरी म्हणाले.

जाहिरात

आपल्या देशात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 1 हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही. येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाही, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे भविष्यात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून यासाठी मार्ग काढून पुण्यासारख्या ठिकाणी इथेनॉलचे पंप काढण्याचा आमचा निर्णय असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

जाहिरात

हे ही वाचा :  दमलेल्या पत्नीनं प्रचार करण्यास दिला नकार, भाजपा नेत्यानं केली हत्या! आणि..

गडकरी पुढे म्हणाले कि, नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इंडियन ऑईलचे तीन पंप सुरू करण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा. इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या