मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

ST driver suicide: एसटी डेपोत उभ्या बसला गळफास घेत चालकाची आत्महत्या, अहमदनगरमधील घटनेने खळबळ

ST driver suicide: एसटी डेपोत उभ्या बसला गळफास घेत चालकाची आत्महत्या, अहमदनगरमधील घटनेने खळबळ

ST डेपोत उभ्या बसला गळफास घेत चालकाची आत्महत्या, घटनेने खळबळ

ST डेपोत उभ्या बसला गळफास घेत चालकाची आत्महत्या, घटनेने खळबळ

ST driver suicide ahmednagar: एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगर, 29 ऑक्टोबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं (ST employee suicide) सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon Ahmednagar) येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या (ST driver commits suicide in bus depot) केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे. दिलीप काकडे हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान दिलीप काकडे यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्यावर कर्ज होते का? किंवा आर्थिक विवंचनेतून त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं का? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीये. महागाई भत्ता वाढीची घोषणा कालच एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अँड अनिल परब यांनी घोषणा केली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांनाही 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. याआधी या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. याशिवाय याशिवाय घरभाडे भत्ता 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के असा करण्याची मागणी अनिल परब यांनी मान्य केली. या आधी हा भत्ता 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के असा मिळत होता. गेल्या महिन्यात संगमनेरमध्ये चालकाची बसमध्ये आत्महत्या गेल्या महिन्यात 21 सप्टेंबर रोजी अहमदमगरमध्येच एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये (Sangamner bus depot) हा प्रकार घडला होता. या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली होती. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असे होते. एसटी बसचे चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधली संगमनेर बस डेपो येथे एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं. पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. पाथर्डी - नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला. धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची आत्महत्या ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनही केलं होतं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Suicide

पुढील बातम्या