धुळे जिल्ह्यातील साक्री येथून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे साक्री एसटी डेपोमधील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री एसटी डेपोमधून ही घटना समोर आली आहे.
2/ 5
एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
3/ 5
या आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.
4/ 5
आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
5/ 5
साक्री आगारातील संतप्त कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्याच्या आत्महत्येनंतर आंदोलन पुकारलं आहे. मृत बेडसे यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही सरकारकडून केली जात आहे.