• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • दिवाळीपूर्वी ST कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; परिवहन मंत्री अनिल परबांची मोठी घोषणा

दिवाळीपूर्वी ST कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; परिवहन मंत्री अनिल परबांची मोठी घोषणा

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संपही मागे घेण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर : दिवाळीच्या (Diwali) आधी ST कर्मचाऱ्यांसाठी (ST staff) मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. दरम्यान परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अँड अनिल परब (Anil Parab) यांनी मोठी घोषणा केली आहे. (Good news for ST employees before Diwali Transport Minister Anil Parbas big announcement) त्यामुळे आज मध्यरात्री 12:00 पासून बेमुदत संप मागे घेतल्याचे महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी संयुक्त कृती समितीने जाहीर केले. यंदाची दिवाळी प्रवासी आणि एसटी कर्मचारी दोघांसाठीही गोड जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांनाही 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हे ही वाचा-Mumbai : दिवाळीपूर्वी मुंबईकरांना मिळाली Good News, लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. याआधी या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. तो 27 टक्के वाढवून देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकताच जाहीर केला होता. मात्र या वाढीला एस टी कर्मचाऱ्यांनी नकार देत सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, अशी त्यांची मागणी होती. या आणि अन्य मागण्यांसाठी एस टी कर्मचारी ऐन दिवाळीच्या आधी संपावर गेल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली होती. याशिवाय याशिवाय घरभाडे भत्ता 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के असा करण्याची मागणी अनिल परब यांनी मान्य केली. या आधी हा भत्ता 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के असा मिळत होता.
  Published by:Meenal Gangurde
  First published: