मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /खर्डा किल्ल्यावरील भगवा झेंडा भेदणार आकाश; देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज ठरणार

खर्डा किल्ल्यावरील भगवा झेंडा भेदणार आकाश; देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज ठरणार

नगर जिल्ह्यातील खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यातील खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे.

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा किल्ल्यावर (Kharda Fort) देशातील सर्वात उंच भगवा ध्वज (Tallest saffron flag in india) फडवण्यात येणार असल्याची माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे.

पुढे वाचा ...

अहमदनगर, 16 ऑगस्ट: नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा किल्ल्यावर (Kharda Fort) देशातील सर्वात उंच भगवा ध्वज (Tallest saffron flag in india) फडकवण्यात येणार असल्याची माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे. शौर्य आणि एकतेचं प्रतिक म्हणून हा झेंडा किल्ल्याच्या आवारात फडकवण्यात येणार आहे. हा झेंडा 74 मीटर उंचीचा असणार आहे. त्यामुळे हा स्वराज्य ध्वज देशातील सर्वात उंचावरील ध्वज ठरणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: रोहित पवार यांनी केली आहे. 15 ऑक्टोबर 2021 रोजी हा ध्वज फडकवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख संताच्या हस्ते या झेंड्याची पूजा करण्यात आली आहे. त्यानंतर आता हा ध्वज देशातील प्रमुख धार्मिक स्थळावर आणि पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी हा झेंडा खर्डा किल्ल्यावर फडकवण्यात येणार आहे. तब्बल 18 टन वजन असलेल्या खांबावर 90 किलो वजनाचा आणि 96x64 फूट आकाराचा भव्य-दिव्य स्वराज्य ध्वज आकाशाला गवसणी घालणारा ठरणार आहे. याची उंची तब्बल 74 मीटर इतकी असणार आहे.

हेही वाचा-बैलगाडा शर्यतीसाठी राजकीय आत्महत्येची तयारी, अमोल कोल्हे आंदोलनाच्या पावित्र्यात

खर्ड्याच्या किल्ल्यावर फडकवण्यात येणारा स्वराज्य ध्वज देशातील किंबहुना जगातील सर्वांत उंचावर (74 मीटर) फडकवण्यात येणार आहे. भगव्या स्वराज्य ध्वजाचं संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आहे. पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख 74 अध्यात्मिक आणि धार्मिक स्थळी, संत पीठांच्या ठिकाणी फिरवण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे.

हेही वाचा-''अजित पवार माझे मित्र आहेत...'', 12 सदस्यांच्या यादीवर राज्यपालांचं खास उत्तर

त्याठिकाणी पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या आवारात या ध्वजाची पूजा केली जाणार आहे.  हा ध्वज कोणा एका धर्माचा नसून स्वराज्याचं प्रतिक म्हणून फडकवण्यात येणार आहे, असंही रोहित पवार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Rohit pawar