मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /धक्कादायक ! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, महिन्याभरात तीन वेळा केलं घृणास्पद कृत्य

धक्कादायक ! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, महिन्याभरात तीन वेळा केलं घृणास्पद कृत्य

Minor daughter sexually abused by father: वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे.

Minor daughter sexually abused by father: वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे.

Minor daughter sexually abused by father: वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे.

अहमदनगर, 30 सप्टेंबर : मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Minor daughter sexually abused by father) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई बाहेरगावी गेली असताना 28 जुलैच्या रात्री बापाने 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दोनवेळा लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आईला दिली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भातील वृत्त लोकमत डॉट कॉमने दिलं आहे.

मुलगी रात्री झोपलेली असताना वडिलांनी तिचा गैरफायदा घेत लैंगित अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे.

भिवंडीत चुलत भावाकडून अत्याचार

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 24 वर्षीय चुलत भावाने 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या चुलत भावाला आज सकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील एका गावातून पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी तालुका ग्रामीण भागातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तिच्या घरातच आरोपी चुलत भाऊ राहतो. काही महिन्यापासून तो पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता. त्यातच आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नव्हती. परंतु पीडित अल्पवयीन मुलीने 26 सप्टेंबर रोजी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

जयपूरमध्ये बापाने पोटच्या लेकीला आपटून आपटून केलं ठार

राजस्थानमधील बारां जिल्ह्यात नवरा आणि बायकोच्या भांडणात सहा महिन्यांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. पवन आणि सीमा या जोडप्याला आरुषी नावाची 6 महिन्यांची मुलगी होती. या पती-पत्नीत गेल्या काही महिन्यांपासून जोरदार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर पवननं सीमाच्या कुशीतून मुलीला हिसकावून घेतलं होतं. मुलगी आपल्याकडेच राहिल, असं सांगत त्याने सीमाला घरातून हाकलून दिलं.

आदल्या दिवशी माहेरी राहिलेली सीमा दुसऱ्या दिवशी पुन्हा बाळाला घेण्यासाठी सासरी आली. त्यावेळी पुन्हा एकदा पवन आणि सीमामध्ये कडाक्याचं भांडण सुरु झालं. पवनने रागाच्या भरात सीमाच्या कुशीतून मुलीला उचललं आणि तिला जोरात जमिनीवर आपटलं.

First published:

Tags: Ahmednagar, Crime, Rape