मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 10 जणांचा होरपळून मृत्यू, ही आहेत मृतकांची नावे

Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 10 जणांचा होरपळून मृत्यू, ही आहेत मृतकांची नावे

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 10 जणांचा होरपळून मृत्यू, ही आहेत मृतकांची नावे

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 10 जणांचा होरपळून मृत्यू, ही आहेत मृतकांची नावे

Ahmednagar Hospital Fire news updates: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अहमदनगर, 6 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Ahmednagar Civil Hospital Fire) आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू (10 patients died in Ahmednagar Hospital Fire) झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

मृतकांची नावे

रामकिसन विठ्ठल खरपुडे

सिताराम दगडू जाधव

सत्यभामा शिवाजी घोडेचौरे

कडूबाई गंगाधर खाटीक

शिवाजी सदाशिव पवार

दीपक विश्वनाथ जडगुळे

कोंडाबाई मधुकर कदम

आसराबाई गोविंद नागरे

शाबाबी अहमद सय्यद

अनोळखी पुरुष

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीची भीषणता दाखवणारे PHOTOS

आयसीयू कक्षामध्ये 17 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला.

आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा मृत्यू तर इतरही काही रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

वाचा : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू

ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले.

दोषींवर कारवाईची मागणी

या दुर्घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Fire, Hospital Fire