बापरे ! Mobile देण्यास नकार दिल्याने पत्नीवर भररस्त्यात सपासप वार, नगरमधील धक्कादायक घटना

बापरे ! Mobile देण्यास नकार दिल्याने पत्नीवर भररस्त्यात सपासप वार, नगरमधील धक्कादायक घटना

Wife killed by husband : मोबाइल न दिल्याच्या रागातून पत्नीवर वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 23 ऑक्टोबर : पती आणि पत्नी यांच्यात वाद होतच असतात. मात्र, आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापाच्या भरात नवऱ्याने भररस्त्यात पत्नीवर वार करुन तिला संपवलं आहे. ही घटना अहमदनगरमधील राशीन (Rashin Ahmednagar) येथे घडली आहे. पत्नीने मोबाइल देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या पतीने तिच्यावर चाकुने सपासप वार करत जीव घेतला. (husband killed wife for not giving mobile)

राहुल भोसले आणि दीपाली हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राहतात. पत्नीने आपला मोबाइल फोन लपवून ठेवण्याचा संशय राहुल भोसले याला होता. दीपाली घटनेच्या दिवशी आपल्या बहिणीसोबत जात असताना राहुलने त्यांना रोखले. यावेळी राहुलने दीपालीकडे मोबाइल पोन मागितला. मात्र, आपल्याकडे फोन नसल्याचं दिपालीने सांगितलं.

यानंतर संतापलेल्या राहुल भोसले याने दीपालीवर चाकूने सपासर वार केले. यावेळी दीपालीची बहीण लता ही तिच्या बचावासाठी पुढे आली असता राहुलने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात दीपालीचा मृत्यू झाला आहे. तर दीपालीची बहीण लता ही जखमी झाली आहे. जखमी लतावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भररस्त्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपली सूत्रे हलवली आणि आरोपी राहुल भोसले याला अवघ्या काही तासांतच गजाआड केले. आरोपी राहुल भोसले याला अटक करण्यासाठी पोलिसांच्या एकूण तीन टीम बनवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

भंडाऱ्यात मोबाइल न दिल्याने नवऱ्याचे कापले ओठ

काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासाळ याठिकाणी देखील एक विचित्र घटना घडली. येथील एका विवाहित महिलेनं मोबाइलसाठी आपल्या पतीचे ओठ थेट विळ्याने कापले आहेत. या घटनेत पीडित पतीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जखमी पतीचा जबाब नोंदवून घेतला असून पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

खेमराज बाबूराव मूल असं जखमी झालेल्या 40 वर्षीय पतीचं नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील रहिवासी आहेत. जखमी खेमराज यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाइल खराब झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाइल काही दिवस वापरण्यासाठी घेतला होता. दोन दिवस उलटून देखील पतीने मोबाइल परत केला नव्हता. यामुळे पत्नीला आपल्या पतीचा राग आला होता. यातूनच गुरुवारी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, संतापलेल्या पत्नीने धारदार विळा पती खेमराज यांना फेकून मारला. या विळा थेट खेमराज यांच्या ओठावर लागून त्यांचे ओठ कापले गेले आहेत.

Published by: Sunil Desale
First published: October 23, 2021, 10:49 AM IST

ताज्या बातम्या