Home /News /ahmednagar /

मुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट

मुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट

Coronavirus In Maharashtra : अहमदनगरमधील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढलं आहे.

  अहमदनगर, 18 मे : मुंबई (Mumbai coronavirus), पुणे (Pune coronavirus), ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी थैमान घालणाऱ्या कोरोनाने आपला मोर्चा आता अहमदनगरकडे (Coronavirus in Ahmednagar) वळवला आहे. मुंबई, पुण्यातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांपेक्षाही दुप्पट रुग्ण अहमदनगरमध्ये आढळले आहेत. यामुळे फक्त राज्यच नव्हे तर केंद्र सरकारचंही टेन्शन वाढलं आहे. राज्याने आरोग्य विभागाने जारी केलेल्या 18 मेच्या आकडेवारीनुसार (Coronavirus in Maharashtra) राज्यात 28 हजार 438 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी मुंबई महापालिकेत 961 आणि पुणे महापालिकेत 1090 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर अहमदनगरमध्ये 1917 कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या मुंबई आणि पुण्यातील रुग्णसंख्येपेक्षा दुप्पट आहे. हे वाचा - पुण्यात म्युकरमायकोसीसच्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट अहमदगनरमध्ये आता एकूण 1,67,867 रुग्ण आहेत. दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा आता 1,597 वर पोहोचला आहे. याआधी केंद्रानेही देशातील कोरोनाचा रिपोर्ट जारी केला होता. महाराष्ट्रात अहमदनगरमध्येच कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याचं सांगितलं होतं. या एकट्या जिल्ह्याने राज्यासह केंद्राची चिंता वाढवली आहे. हे वाचा - तुमची कमिटमेंट विसरू नका, WHO च्या विनंतीनंतर कोरोना लशीबाबत Serumचा मोठा निर्णय एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता, राज्यात कोरोना रुग्णसंख्येच कमालीची घट झाली आहे. कधी 50 हजारांच्या वर नवे रुग्ण सापडत होते ते प्रमाण आता 30 हजारांच्या खाली आलं आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही कमी झाली आहे. राज्यात आता 4 लाख 15 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. नवे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले असले तरी मृत्यूच्या आकड्याने मात्र चिंता वाढवली आहे. दिवसभरात  679 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Ahmednagar, Coronavirus

  पुढील बातम्या