पुणे, 18 मे : एकिकडे कोरोनाची (Coronavirus) प्रकरणं वाढत आहेत तर दुसरीकडे कोरोना लशींचा (Corona vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती फक्त भारताचीच नाही, तर जगातील अनेक देशांची आहे. जागतिक स्तरावर विविध देशांना ज्या कोवॅक्सच्या माध्यमातून लसपुरवठा केला त्या कोवॅक्समध्येही लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) डोळे आता पुन्हा भारताच्या मदतीकडे लागले आहेत. विशेषतः पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ऑफ इंडियाने (Serum Institute of India) कोवॅक्सला (Covax) लशींचा पुरवठा करावा अशी विनंती डब्ल्यूएचओने केली आहे. त्यानंतर सीरमनेही आपला निर्णय जाहीर केला आहे.
देशातील कोरोनाची वाढती प्रकरणं आणि लशींची गरज पाहता अद्याप तरी सीरम कोरोना लस निर्यात करण्याच्या तयारीत नाही. कोरोना लशीची निर्यात करण्याबाबत सीरम इन्स्टिट्यूटने एक पत्रक जारी केलं आहे. जे ट्वीटही करण्यात आलं आहे.
Important Information pic.twitter.com/M1R1P6rqUp
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) May 18, 2021
परिपत्रकात सीरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं, "सीरम इन्स्टिट्यूटने 200 दशलक्षपेक्षा जास्त डोस इतर देशांना दिलेले आहेत. कोरोना लशीची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या पहिल्या तीन देशांमध्ये आम्ही आहोत. भारतातील नागरिकांची किंमत मोजून लस कधीत निर्यात केली नाही. 2021 मध्ये देशातील कोरोनाचा लढा आणखी तीव्र झाला आहे. आम्ही आमच्या लशीचं उत्पादन वाढवत आहोत आणि भारताला प्राधान्य देत आहोत. कोवॅक्सला आम्ही या वर्षाच्या अखेरपर्यंत लशीचा पुरवठा करू अशी आम्हाला आशा आहे"
हे वाचा - सिंगापूरहून येणारी विमानं थांबवा, मुलांना धोका; केजरीवालांची केंद्राला विनंती
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेसियस (Tedros Adhanom Ghebreyesus) भारतातील कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोवॅक्सला लस पुरवठा करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करावी लागेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या या विनंतीनंतर सीरमने आपली भूमिका मांडली आहे.
हे वाचा - पुन्हा बदलणार नियम! आता कोरोनातून बरं झाल्यानंतर लसीकरणासाठी 9 महिने प्रतीक्षा?
कोवॅक्स ही जागतिक संस्था आहे. यामार्फत लशी इतर देशांना पुरवल्या जातात. जगभरातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगातील लशींच्या पुरवठाही प्रभावित झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Who