अहमदनगर, 16 मे : गेल्या काही दिवसांत अहमदनगरमध्ये (Ahmednagar ) मारहाणीच्या घटना वाढल्यात. आता तर क्षुल्लक कारणावरुन पेट्रोल पंपावर (Free style fight) तुफान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी पुढे घेण्याचे सांगितल्यावरून दुचाकीस्वार आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यास मिळाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील टॉप अप पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. नियमितपणे पेट्रोल भरण्यासाठी एक तरुण आपल्या मित्रांसह आला होता. पंपावर पेट्रोल भरल्यानंतर कर्मचाऱ्याने त्याला गाडी पुढे घेण्याचे सांगितले होते. पण, यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.
गाडी पुढे घेतल्यानंतर या तरुणाने कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. त्यानंतर बघता बघता दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. पंपावरच दोघांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी उपस्थितीत काही तरुण दोघांना सोडवण्यासाठी पुढे आले.
(आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video)
त्यानंतर आपल्या मित्राला मारहाण केल्याचे पाहून पंपावरील इतर कर्मचारी मदतीला धावून आले आणि या तरुणाला मारहाण केली. त्यामुळे पेट्रोल पंपवर यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी भांडण सोडवले. या घटनेचा व्हिडीओ पेट्रोल पंपावरील cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घोडागाडी शर्यतीमध्ये तरुणाला चिरडले
दरम्यान, कोल्हापूरमध्ये घोडागाडी शर्यतीमधील (Horse racing) एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक गाड्यांखाली एक तरुण सापडला. या तरुणाच्या अंगावरून एकाच वेळी 3 ते 4 गाड्या गेल्या. सुदैवाने या घटनेतून तो थोडक्यात बचावला. कोल्हापूरमध्ये घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यंत अगदी सुरळीतपणे सुरू होती. मात्र अचानक एक गाडीवान घोडागाडीपुढे पळत होता. पळता पळता त्याचा तोल सुटल्याने तो थेट घोड्यांच्या टापाखाली आला आणि पाठीमागून येणाऱ्या अनेक गाड्या त्याच्या अंगावरुन सुसाट वेगाने धावून गेल्यात. एकापाठोपाठ तीन ते चार गाड्यांनी या तरुणाला तुटवून पुढे निघून गेल्या. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी असतानाही त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येऊ शकलं नाही. कारण घोड्यांच्या गाड्यांचा वेगच तेवढा जबरदस्त होता. त्यामुळे अनेक घोडागाड्या त्याच्या अंगावरून गेल्याचे या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे शर्यतीचा आनंद लुटत असताना आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. आपल्यासोबत कोणतीही दुर्घटना घडणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. अचानक झालेल्या या घटनेनंतर गाड्या थांबल्या आणि या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.