मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /BREAKING : अण्णा पुन्हा बसणार उपोषणाला, ठाकरे सरकारला दिला इशारा

BREAKING : अण्णा पुन्हा बसणार उपोषणाला, ठाकरे सरकारला दिला इशारा

'महाविकास आघाडी सरकार पडायला घाबरतं. त्यामुळे आम्ही ठरवलंय. राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी मोठं आंदोलन करायचं'

'महाविकास आघाडी सरकार पडायला घाबरतं. त्यामुळे आम्ही ठरवलंय. राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी मोठं आंदोलन करायचं'

'महाविकास आघाडी सरकार पडायला घाबरतं. त्यामुळे आम्ही ठरवलंय. राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी मोठं आंदोलन करायचं'

अहमदनगर, 10 सप्टेंबर : हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे ( Anna Hazare) यांनी ठाकरे सरकारला (mva goverment) आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा (lokpal and lokayukta act 2013) खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने जर मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात सक्षम लोकायुक्ताकडे पुरावे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई करतील इतका प्रभावी व सक्षम असा हा कायदा आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे चालढकल करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Weather Alert: पुढील 5 दिवस पुण्याला झोडपणार पाऊस; हवामान खात्याकडून हाय अलर्ट

आम्ही 2011 पासून आंदोलन करत आलोय. भाजपच्या काळात सुद्धा आंदोलन करण्यात आले आहे. या सरकारला लोकपाल व लोकायुक्त कायदा आणण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे या सरकारला  तीन महिन्याचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात वयाच्या 85 व्या वर्षी सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय.

भयंकर ! अमेरिकेतील शाळांमध्ये कोरोनाचा कहर, साडेसात लाख मुलांना लागण

करेंगे या मरेंगे असं म्हणत आम्ही २०११ मध्ये आंदोलन केलं होतं. केंद्रामध्ये लोकपालला सरकार घाबरलं होतं, जेव्हा देशभरात आंदोलन झाल्यानंतर मान्य केलं. त्यामुळे  महाविकास आघाडी सरकार पडायला घाबरतं. त्यामुळे आम्ही ठरवलंय. राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी मोठं आंदोलन करायचं ठरवलं आहे. आतापासून आम्ही कार्यकर्त्यांना कळवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सांगत आहोत, आंदोलनाच्या तयारी लागा. हे सरकारचं बघू, आता सप्टेंबर आहे, आम्ही एक नोटीस देणार आहोत, त्यानंतर एकाच वेळेला राज्यभरात मोठं आंदोलन करणार आहोत, अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहोत, असंही अण्णांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Anna hazare