मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

भयंकर! 24 तासांत फक्त एकाच जिल्ह्यात सापडली 374 कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलं

भयंकर! 24 तासांत फक्त एकाच जिल्ह्यात सापडली 374 कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलं

राज्यात आता लहान मुलांमधील कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं आव्हान आहे.

राज्यात आता लहान मुलांमधील कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं आव्हान आहे.

राज्यात आता लहान मुलांमधील कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं आव्हान आहे.

  • Published by:  Priya Lad

हर्मन गोम्स/ अहमदनगर, 24 मे : एकिकडे कोरोनाची दुसरी लाट, त्यानंतर तिसऱ्या लाटेचीही शक्यता. त्यात ब्लॅक, व्हाइट आणि यलो फंगसचं संकट आणि आता प्रौढांसह लहान मुलांनाही (Coronavirus in kids) कोरोनापासून वाचवण्याची धडपड. गेल्या वर्षी लहान मुलांना कोरोना (Corona positive kids) झाल्याची प्रकरणं तशी कमी होती. पण यावर्षात मात्र ही प्रकरणं लक्षणीयरित्या वाढली आहे. कोरोना प्रकरणं कमी होत असलेल्या महाराष्ट्रात आता लहान मुलांना (Maharashtra corona positive children) होणाऱ्या कोरोनाचं नवं आव्हान उभं ठाकलं आहे.

महाराष्ट्रात लहान मुलांना सर्वाधिक कोरोना झाल्याची प्रकरणं आहेत ती अहमदनगरमध्ये (Ahmednagar coronavirus). राज्यात एकट्या नगर जिल्ह्यातच गेल्या 24 तासांच तब्बल 374 कोरोना पॉझिटिव्ह मुलं (Ahmednagar corona positive kids) सापडली आहेत आणि ही परिस्थिती खूपच गंभीर आहे.

दरम्यान केंद्र सरकारने शनिवारी सांगितलं की, मुलं कोरोना संसर्गापासून सुरक्षित नाहीत, पण सध्या या विषाणूचा परिणाम मुलांवर कमी होत आहे. जगाची आणि देशाची आकडेवारी पाहिल्यास फक्त 3 ते 4 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे.

NITI आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, 'जर मुलं कोव्हिड संक्रमित असतील तर बऱ्याचदा कोणतंही लक्षण नसतं किंवा कमीतकमी लक्षणे दिसून येतात. त्यांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. परंतु आपण 10-12 वर्षाच्या मुलांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे

कोरोनातून बरं झाल्यानंतर सिंड्रोमचा धोका

कोरोनातून बरं होणाऱ्या लहान मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ (MIS-C) आढळत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. तसंच कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक आठवड्यांनी याचे परिणाम जाणवू लागतात.

फोर्टिस हेल्थकेअरमध्ये बालरोगतज्तज्ञ असलेल्या डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, MIS-C  हा आजार मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी होतो. यामुळे लहान मुलांच्या जिवाला धोका आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र हा संसर्ग निश्चितपणे मुलांना अतिशय वाईट पद्धतीनं आपल्या विळख्यात घेतो. तो मुलांच्या हृदय (Heart), यकृत आणि किडनीवर (kidneys) थेट परिणाम करू शकतो.

हे वाचा - Black, White नंतर Yellow Fungus, आणखी एक भयंकर फंगल इन्फेक्शन; अशी आहेत लक्षणं

कोरोनाबाबत अनेकजण जास्त काळजी करत नाहीत. कारण बहुतेकांमध्ये याची हलकी लक्षणं दिसतात किंवा काहींना याचा फार त्रास होत नाही. मात्र कोरोनामुळे लहान मुलांमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीच अधिक घातक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अँटीबॉडीचा परिणाम लहान मुलांच्या शरीरावर होतो. यामुळे त्यांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.

लहान मुलांसाठी गेमचेंजर ठरणार नाकावाटे दिली जाणारी लस

भारतात कोरोना लशीचं लहान मुलांवर क्लिनिक ट्रायल घ्यायला परवानगी देण्यात आलेली आहे. भारत बायोटेक आपल्या कोवॅक्सिन लशीची लहान मुलांवर चाचणी करणार आहे. हे ट्रायल जूनपासून सुरू करण्याची शक्यता आहे.

दरम्यान याच कंपनीची नेझल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लशीद्वारे नाकातून डोस दिले जातील. ही लस लहान मुलांसाठी गेमचेंजर ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) की मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

हे वाचा - राज्याची रुग्णसंख्या कमी मात्र 'या' जिल्ह्यात कोरोनाचं संकट कायम

सीएनएन-न्यूज 18 शी बोलताना सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं, 'भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे. शिवाय ही  रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल. जेव्हा मुलांमध्ये कोरोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावं. शिवाय अधिकतर शालेय शिक्षकांनी व्हॅक्सिन घेणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Corona, Corona patient, Coronavirus, Small child