Home /News /agriculture /

Sugarcane Problem : साखर उद्योग अडचणीत येणार? पुढच्या हंगामात साखर उत्पादन वाढणार असल्याने साखरेचा प्रश्न गंभीर

Sugarcane Problem : साखर उद्योग अडचणीत येणार? पुढच्या हंगामात साखर उत्पादन वाढणार असल्याने साखरेचा प्रश्न गंभीर

देशातील यंदाचा साखर हंगाम (sugarcane problems) अद्यापही सुरू असतानाच साखर उद्योगावर (sugarcane business) चिंता व्यक्त केली जात आहे.

  मुंबई, 28 जून : देशातील यंदाचा साखर हंगाम (sugarcane problems) अद्यापही सुरू असतानाच साखर उद्योगावर (sugarcane business) चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा देशात साखरेचे उत्पादन (sugar production) वाढल्याने साखर निर्यातीवर बंदी (sugar export ban) घालण्यात आली आहे. यामुळे देशात साखरेचा साठा शिल्लक आहे हा साठा शिल्लक असताना देशात पुढच्या हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार असल्याने साखरेचा साठा (sugar stock) प्रमाणापेक्षा जादा झाल्यास साखर उद्योगातील (sugar business problem) अडचणी वाढण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत साखर उद्योगात भविष्याबाबत भिती व्यक्त केली जात आहे.

  केंद्राने निर्यातीवरील निर्बंध पुढील हंगामात हटवावेत, अन्यथा साखर उद्योगाला चिंताजनक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या बतीने पुढील हंगामात किती ऊस उत्पादन होईल, या बाबत अंदाज घेण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत उपग्रह प्रतिमांच्या आधारे पहिला अंदाज जाहीर केला जाऊ शकतो. असे अॅग्रोवनने माहिती दिली आहे.

  हे ही वाचा : 3 दिवसांमध्ये 160 जीआर, राज्यपालांनी मागितला सरकारकडे खुलासा

  सध्या अंदाजाची प्रक्रिया सुरू असली तरी एकूण आकडेवारी पाहता गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊस क्षेत्र जादा होईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भात उसाच्या लागवडी जादा प्रमाणात झाल्याची आकडेवारी कारखाना घेत असलेल्या माहितीतून सामोरी येत आहे. येणाऱ्या हंगामात सरत्या हंगामाइतके साखर उत्पादन होईलच, पण त्याहूनही जादा साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राने मुक्त निर्यात धोरण स्वीकारावे, अशी मागणी आता बहुतांश संस्थांकडून होत आहे.

  स्थानिक बाजारपेठेत दर किती वाढतील, याची शाश्वती नसल्याने कारखान्यांकडील संकट आणखी गडद होणार असल्याची भीती कारखानदारांना आहे. केंद्राने सरत्या हंगामात शेवटी शेवटी निर्यातीला परवानगी देताना हात आखडता घेतला आहे.

  कारखानदारांना केंद्राच्या निर्णयाचा फटका

  उसाची वाढती उपलब्धता आणि स्थानिक बाजारपेठेत कमी दराचा साखरेला बसणारा फटका, या पार्श्वभूमीवर कारखानदार सध्या अस्वस्थ असल्याचे चित्र साखर उद्योगात आहे. जागतिक बाजारात साखरेला चांगला दर असताना केंद्राच्या निर्णयाचा फटका साखर उद्योगाला बसत आहे. साखर कमी पडणार नाही, अशी शाश्वती देऊन सुद्धा केंद्राकडून अजूनही निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्याने साखर उद्योगातून नाराजी व्यक्त होत आहे.

  हे ही वाचा : माजी आमदारांनाही लागले झाडी..डोंगराचे वेध, शिंदे गटाला दिला पाठिंबा, सेनेला धक्का

  निर्यातीला प्रोत्साहन द्यावे

  बंदरावर तसेच कारखान्यात ही साखर शिल्लक राहू लागल्याने कारखानदार तणावामध्ये आले आहेत. कारखाने बंद झाल्यावर ही साखर शिल्लक राहत आहे. पुढच्या हंगामात तर नवी साखरही शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत केंद्राने निर्यात खुली करावी आणि जितकी साखर म्हणून बाहेर जाईल, तितक्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होत आहे. या बाबत केंद्र व साखर उद्योगातील संस्थांच्या बैठका सुरू असल्या तरी केंद्राने अजूनही तातडीचा निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून निर्बंध लादले गेले तर पुढच्या वर्षी निर्यातीत घट येण्याची शक्यता साखर उद्योगातील संस्थांनी व्यक्त केली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Sugar, Sugar facrtory, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

  पुढील बातम्या