मुंबई, 10 जून : राज्यासह देशभरात केळीला 12 महिने मागणी असते दरम्यान सध्या केळीचे उत्पादन (banana grower farmer) कमी झाल्याने केळीच्या दराला उच्चांकी भाव मिळाला आहे. (banana rate) एका टनास केळीला (banana) विभागनिहाय 15 हजार ते 20 हजार रुपये पर्यंत दर मिळत आहे.
खानदेशामध्ये बहुतांशी करून केळीची लागवड होते. (banana farming) कोरोनामुळे केळीचे मोठे नुकसान झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून केळीच्या लागवडी थांबल्या आहेत. यातच महापुराने नुकसान झाल्याने केळी लागवड करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. तर खानदेशातील केळी उत्पादक तालुक्यांमध्ये व्हायरसमुळे केळी खराब होत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात केळीची टंचाई जाणवत आहे. यामुळे केळीला उच्चांकी दर मिळत आहे
हे ही वाचा : MHADA मास्टर लिस्टसाठी आतापर्यंत दीड हजार अर्ज, अर्जासाठी अटी-शर्थींसह नवीन मुदतवाढ
रमजान महिन्यापासून केळीला चांगला भाव मिळू लागला आहे. ओमायक्रॉनमुळे केळी दरात मोठी घसरण झाली होती यावेळी केळी उत्पादकांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर बाजारपेठा खुल्या झाल्याने केळी दरात वाढ होत राहिली. सध्या पश्चिम महाराष्ट्रात केळी उपलब्ध नसल्याने या भागातील व्यावसायिक सोलापूर टेंभुर्णी जळगाव भागातून केळी घेत आहेत.
पण या भागातही केळीचे प्रमाण कमी असल्याने दरात वाढ होत आहे. पुढील दोन महिने केळी दरात वाढ होत राहिल अशी व्यापाऱ्यांकडून माहिती देण्यात येत आहे.ज्या शेतकऱ्याकडे केळी आहेत या शेतकऱ्यांकडे केळी खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत आहे. अनेकांनी खोडवा, निडवा ठेवला नसल्याने केळीच्या उत्पादनात घट आहे.
सध्या रावेर तालुक्यासह जिल्ह्यात आणि लगतच्या मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर भागात कापणी योग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहेत. यामुळे उत्तर भारतात केळीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. केळीला दोन हजार २०० रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळत आहेत. २०१६-१७ नंतर प्रथमच केळीचे भाव क्विंटलला दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत.
हे ही वाचा : Pm kisan E-kyc : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसानची E- kyc करण्यासाठी मुदतवाढ, हप्ता मिळण्याची ही आहे सोपी पद्धत
गेल्या दोन-तीन वर्षांत जून- जुलै नंतर 'सीएमव्ही' या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. तसेच या काळात लागवड केलेली केळी ऐन कापणीच्या काळात मे अखेर आणि जून महिन्याच्या सुरवातीला येणाऱ्या संभाव्य वादळात सापडण्याची भीती असते. म्हणून गेल्या वर्षी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सुमारे २५ टक्के केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जून-जुलै महिन्यात केळी लागवड केली नाही. आता केळी कमी प्रमाणात कापणीला आली आहे.
तर आणखी भाववाढ
केळीला २०१६-१७ या आर्थिक वर्षांत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला होता. आता त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी केळीला पुन्हा विक्रमी भाव मिळाले आहेत. लागल्यास हेच भाव किमान महिनाभर टिकून राहतील, अशी स्थिती आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे यावर्षी केळी निर्यातीचे प्रमाण नगण्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Price hike