Home /News /agriculture /

Pm kisan E-kyc : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसानची E- kyc करण्यासाठी मुदतवाढ, हप्ता मिळण्याची ही आहे सोपी पद्धत

Pm kisan E-kyc : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसानची E- kyc करण्यासाठी मुदतवाढ, हप्ता मिळण्याची ही आहे सोपी पद्धत

PM Kisan: देशभरातील कोट्यावधी शेतकरी किसान सन्मान योजनेचा (kisan samman yojana) लाभ घेतात, परंतु E- kyc केली नसल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते

  नवी दिल्ली, 10 जून : देशभरातील कोट्यावधी शेतकरी किसान सन्मान योजनेचा (kisan samman yojana) लाभ घेतात दरम्यान मागच्या काही महिन्यात किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. (Pm kisan fund) यासंदर्भात आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-केवायसी (e kyc) करण्याची तारीख 31 मे होती ती वाढवण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी करता येईल. यापूर्वी ही मुदत ३१ मे होती ही वाढवण्यात आली आहे. (PM kisan e-KYC) ओटीपी किंवा बायोमेट्रिक पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी आजअखेर एकूण 4 लाख 98 हजार 80 शेतकऱ्यांपैकी केवळ 2 लाख 98 हजार 623 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित 2 लाख 79 हजार 457 ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. तरी या लाभार्थ्यांनी तत्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले. हे ही वाचा : Rajya Sabha: मतदानापूर्वी आघाडीत बिघाडीची चर्चा; पवारांच्या निर्णयाने मुख्यमंत्री नाराज? भाजपने म्हटलं... पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ३१ मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नाही तर पीएम किसानद्वारे देण्यात येणारे त्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत अशा परिस्थितीत, pmkisan-ict@gov.in शेतकरी वेबसाइटद्वारे ई-केवायसी करू शकतो. हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266 पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261 पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401 पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606 पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109 ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in हे ही वाचा : दाढी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी फायदेशीर आहेत हे 3 फेसपॅक; स्कीन राहील ब्राइट आणि पिंपल फ्री

  पीएम किसानचे पैसे जमा झाले की नाहीत असे तपासा सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. यानंतर 'Farmers Corner' या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary Status क्लिक करा. आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका. त्यानंतर 'Get Report' पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल. या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा हप्ता तीन टप्प्यात येत असतो त्यासाठी सरकारने यावर्षी  PM किसान योजनेची देशभरातील लाभधारी शेतकऱ्यांना e-KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. (PM kisan e-KYC) पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC पूर्ण करण्याची मुभा असणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Narendra modi, PM Kisan

  पुढील बातम्या