मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Kolhapur : ऊसदरासाठी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन का करावं लागतं? पाहा Video

Kolhapur : ऊसदरासाठी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन का करावं लागतं? पाहा Video

X
ऊसदरासाठी

ऊसदरासाठी यावर्षी पुन्हा एकदा आंदोलन पेटलं आहे. या विषयावर शेतकऱ्यांना दरवर्षी आंदोलन का करावं लागतं? या आंदोलनाचा भडका दरवर्षी का उडतो? असे प्रश्न उपस्थित होत असतात.

ऊसदरासाठी यावर्षी पुन्हा एकदा आंदोलन पेटलं आहे. या विषयावर शेतकऱ्यांना दरवर्षी आंदोलन का करावं लागतं? या आंदोलनाचा भडका दरवर्षी का उडतो? असे प्रश्न उपस्थित होत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    कोल्हापूर, 21 नोव्हेंबर :  ऊसदरासाठी यावर्षी पुन्हा एकदा आंदोलन पेटलं आहे. शेतकरी आणि प्रशासन या प्रश्नावर आमने-सामने आहेत. हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय असतात?  शेतकऱ्यांना दरवर्षी आंदोलन का करावं लागतं? या आंदोलनाचा भडका दरवर्षी का उडतो? असे प्रश्न उपस्थित होत असतात.

    ऊस दर आंदोलनाचा हेतू

    शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी 1980 साली सर्वप्रथम ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन केले.  या आंदोलनामध्ये 2000 साली राजू शेट्टी सक्रीय झाले. सुरूवातीला महाराष्ट्रात होणारे हे आंदोलन हळूहळू संपूर्ण देशभर पोहचले.  उत्पादन खर्चावर शेती मालाला आधारभूत भाव मिळावा, हा या आंदोलनामागचा मुख्य हेतू होता.

    दरवर्षी आंदोलन का?

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी हे ऊस दर आंदोलन करावं लागतं. याच पहिलं कारण म्हणजे उसाचे दर हे दरवर्षी नव्याने ठरवले जातात. 'एफआरपीचे दर 460 पासून 3000 रुपयांपर्यंत पोहचले असले तरी गेल्या तीन वर्षांपासून हा भाव कायम आहे.   शेती पिकवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची किंमत ही गगनाला भिडलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऊसाची आधारभूत किंमत ठरवणं गरजेचं आहे,' असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी सांगितले.

    पश्चिम महाराष्ट्रात ऊसदरासाठीचे आंदोलन पेटलं, राजू शेट्टींचा सरकारला अल्टीमेटम

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान गेल्यावर्षीपेक्षा थोडा दर वाढवून देण्याबाबत मागणी असते. सरकारनं किमान आधारभूत किंमत म्हणजेच FRP मध्ये वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. सरकार त्यात वाढ करत नाही. त्यामुळे आंदोलनाचे वारे वाहू लागते, असे ऊस दर आंदोलनाबाबतचे जाणकार सांगतात.

    'एफआरपी मुद्द्याबरोबरच काटामारीचा मुद्दा देखील या आंदोलनाला कारणीभूत ठरतो. शेतकऱ्याचे शोषण जितक्या बाजूंनी करता येईल, तितक्या बाजूंनी ते केले जात आहे. त्याच्यावर उपाय काढणे, हेच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे शेतकरी हे आंदोलन करून न्याय मागत आहेत,' असा दावा जालंदर पाटील यांनी केला.

    ऊस आंदोलनातील प्रमुख मागण्या

    1)एफआरपी रक्कम जास्त मिळावी. 2)ऊस तोडणी मजूर हे महामंडळाने पूरवावेत 3)इथेनॉलला वाढवून भाव मिळावा. 4) शेतकऱ्यांना त्रासदायक असणारी काटामारी थांबवावी.  या ऊस आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.

    PM Kisan Update: खात्यात पैसे आले नाहीत तर कुठे तक्रार करायची?

    ऊस दरामध्ये शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असतं. त्यातच अनेक राजकीय नेते देखील या आंदोलनात उडी मारतात. या आंदोलनामुळे आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी भावना सामान्य शेतकऱ्यांची असते. त्यामुळे सामान्य शेतकरी देखील अनेकदा स्वखुशीनं या आंदोलनाला पाठिंबा देतात, असे या विषयातील अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture, Farmer protest, Kolhapur, Local18