Home /News /agriculture /

Weather update : विदर्भात उष्णतेची लाट कायम, राज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ

Weather update : विदर्भात उष्णतेची लाट कायम, राज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ

उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. (India Meteorological Department

    मुंबई, 05 मे : देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात कमी जास्त पणा आढळून येत आहे. देशातील सर्वात जास्त तापमानाची नोंद महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात नोंद झाली आहे. (Weather update) काल (दि. 04) 44.5 अंस सेल्सिअंस तापमानाची नोंद झाली.  दरम्यान आज उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. (India Meteorological Department)  बुधवारी (ता. 5) संध्यापर्यंत राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले सरासरी कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई 35.4 अंश सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली पण वातावरण दमट असल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवत होती.  पुणे ३८, धुळे 43.0, जळगाव 44.0, कोल्हापूर 39.0, सातारा 38.2, सांगली 39.1, सोलापूर 42.०, रत्नागिरी 33.3, औरंगाबाद 41.2 , अकोला ४४.२, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने 44 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली. हे ही वाचा : भाविकांच्या तक्रारीनंतर शनिशिंगणापूर देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय, झाला 'हा' मोठा बदल शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार हवामानाचा अंदाज शेती, शेती आणि सिंचन, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी हवामानाचा अंदाज मराठीसह अन्य 24 सोप्या भाषेत सांगणारे अ‍ॅप आता लवकरच उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्तपणे ही प्रणाली विकसित करण्यात येत असून ती लवकरच शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने ही प्रणाली विकसीत करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण, शहरी आणि जिल्हा स्तरावरील नागरिकांसाठी हवामानाचे अंदाज सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या प्रणालींची निर्मिती केली जाणार आहे.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Todays weather, Weather, Weather today at my location, Weather warnings

    पुढील बातम्या