मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

भाविकांच्या तक्रारीनंतर शनिशिंगणापूर देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय, झाला 'हा' मोठा बदल

भाविकांच्या तक्रारीनंतर शनिशिंगणापूर देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय, झाला 'हा' मोठा बदल

शनिशिंगणापुरात (shani shingnapur) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक आणि त्यासदंर्भात वारंवार वाढणाऱ्या तक्रारीची दखल अखेर देवस्थाननं घेतली

शनिशिंगणापुरात (shani shingnapur) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक आणि त्यासदंर्भात वारंवार वाढणाऱ्या तक्रारीची दखल अखेर देवस्थाननं घेतली

शनिशिंगणापुरात (shani shingnapur) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक आणि त्यासदंर्भात वारंवार वाढणाऱ्या तक्रारीची दखल अखेर देवस्थाननं घेतली

  • Published by:  sachin Salve

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

अहमदनगर, 05 मे : शनिशिंगणापुरात (shani shingnapur) पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक आणि त्यासदंर्भात वारंवार वाढणाऱ्या तक्रारीची दखल अखेर देवस्थाननं घेतली आहे. पूजा साहित्यात देण्यात येणाऱ्या यंत्राची तक्रार भाविकानं थेट राज्य सरकारला केल्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानने (shani shingnapur devasthan) पुजासाहित्यातील सर्व यंत्र मंदिरात नेण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

देवावरील श्रद्धेचा फायदा घेत पुजासाहित्यातील यंत्राच्या माध्यमातून भाविकांची दिशाभूल केली जात होती. अव्वाच्या-सव्वा पैसे भाविकांकडून उकळले जात असल्याने देवस्थानने यंत्र बंदीचा धाडसी निर्णय घेतला असून अंमलबजावणी सुरू केली आहे.  30 एप्रिलच्या शनिवार रोजीच्या अमावस्या यात्रेत मंदिर परीसरात यंत्राचा सडा पडला होता. पायदळी पडणाऱ्या यंत्राने पावित्र्य बिघडत आहे, अशी तक्रार भाविकांनी राज्य सरकारला केली होती.

(मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचं मुंबई पोलिसांना पत्र, थेट कारवाईची मागणी)

यानंतर विश्वस्त मंडळाने बैठक घेवून पुजेच्या ताटातील नवग्रह यंत्र, शनियंत्र, शिक्का व कलश यंत्र मंदिरात घेवून जाण्यास बंदी घातली आहे. महत्त्वाचे म्हणजे मंदिर परिसरात आणि रस्त्यावर पडलेल्या यंत्रांमुळे पावित्र्या बरोबर भाविकांच्या पायाला देखिल दुखापत होत होती. मंदिर परिसरात भाविक अनवानी पायानं असतात, लहान मुलांना या यंत्राचा अधिक त्रास होत होता. त्यामुळे शनैश्वर देवस्थाननं सर्व पुजा-साहित्य विक्रेत्यांना यंत्र बंदीबाबत सुचित केलंय. तर त्याचबरोबर या वस्तू मंदिरात जाणार नाही याकरीता सुरक्षा विभागाचे पथक महाद्वारमध्ये ठेवण्यात आले आहे. या धाडसी निर्णयानंतर पुजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

(IPL 2022 : धोनी आऊट झाल्यानंतर विराटने दिली शिवी? Video होतोय Viral)

बंदी घातलेल्या वस्तूसह पुजेचे ताट पाचशे ते दोन हजारास विकले जात होते. देवस्थानच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. तसंच यंत्र बंदीचा निर्णय कायम स्वरुपी अमलात रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

इतर वस्तूंवर बंदी येणार का ? भाविकांचा सवाल

शनैश्वर देवस्थानन यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नालविक्री व काळ्या तिळाच्या तेलाबाबत मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेली आहे, असे सांगून पाचशे ते एक हजार रुपये घेतले जातात अशा वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी भाविक करत आहे.

भोग्यांसाठी परवानगी अर्ज दाखल

शनैश्वर मंदिरात परंपरेनं पहाचे 4:30 वाजेची आरती ही ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर) विनाच होते. या आरतीला कधीच भोग्याचा वापर देवस्थान कडून होत नाही. मात्र दुपारची 12 वा. आणि संध्याकाळची सुर्यास्त आरतीच्या वेळी होणाऱ्या दोन्ही आरत्यांसाठी ध्वनीक्षेपक वापरले जाते. यासाठी शनैश्वर देवस्थानं रितसर परवानगी अर्ज दाखल केल्याच उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी स्पष्ट केलंय आहे.

First published: