नाशिक, 09 नोव्हेंबर : नाशिकची द्राक्षे ही जगभरात प्रसिद्ध आहेत. द्राक्षे उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या प्रकोपाणे द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागेच मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता डावणी,भुरी,करपा या रोगांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागा झोडपल्यामुळे त्यांची गर्भधारणा चांगली झाली नाही. तुरळक माल असल्याने त्या बागेला कितपत खर्च करायचा असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. नाशिकमधील मखमलाबाद परिसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी किशोर पिंगळे यांच्या द्राक्ष बागेची ही परिस्थिती अशीच आहे. अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यात डावणी,भुरी,करपा या रोगांनी थैमान घातलं आहे. सतत वातावरण बदलत असल्यामुळे औषधांची फवारणी जास्त प्रमाणात करावी लागतं आहे. मात्र, खर्च करूनही उत्पादन किती निघेल हा प्रश्न आहे. द्राक्ष बागाना लागणाऱ्या औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एक एकर द्राक्ष बागेला जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो, अशी प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादक किशोर पिंगळे यांनी दिली आहे. Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती! सद्याच वातावरण द्राक्ष बागांसाठी पोषक मागील काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, त्यातून वाचलेल्या द्राक्ष बागांसाठी सद्याच वातावरण पोषक आहे. आद्रता कमी झाली आहे. तसेच थंडी देखील प्रमाणात आहे. त्यामुळे रोगांना अटकाव होत आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग परिसरात झालेला पाऊस इकडे यायला नको अन्यथा जास्त प्रमाणात नुकसानी होतील. 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. मात्र, सद्य स्थितीत तापमान चांगल आहे. द्राक्ष बागायदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली आहे.
लवकरच वाढणार सोयाबीनचे दर, काय आहे कारण? वाचा सविस्तर
सरकारकडे मदतीची मागणी अवकाळी पावसामुळे इतकं नुकसान होऊन देखील राज्य सरकारकडून मदत अद्याप तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीये. ती मदत मिळाली पाहिजे. तेव्हाच शेतकरी वाचेल. इतकं नुकसान झालं आहे की शेतकरी उजरणार नाही. मागील दोन वर्षात कोरोना काळात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेल नाही,अशी प्रतिक्रिया शेतकरी संदीप पिंगळे यांनी दिली आहे.