जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / लिंबानंतर आता Tomato सुद्धा होऊ शकतो महाग, हे आहे मोठं कारण

लिंबानंतर आता Tomato सुद्धा होऊ शकतो महाग, हे आहे मोठं कारण

पचनाशी संबंधित काही इतर लक्षणे देखील दिसू शकतात, जसे की पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे इ.

पचनाशी संबंधित काही इतर लक्षणे देखील दिसू शकतात, जसे की पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे इ.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात टोमॅटो मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मात्र, ही भाजी नाशिवंत आहे. शिवाय, टूटा एब्सलुटा (Tuta absoluta) असं किडीमुळे शेतकऱ्यांनी यंदाही टोमॅटो महाग होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 एप्रिल : दिवसेंदिवस भाज्या महाग होत चालल्या आहेत. यातून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. लिंबाच्या किमती वाढल्यानंतर आता टोमॅटोच्याही किमती वाढत (tomato price hike) आहेत. टोमॅटोच्या मोठ्या उत्पादकांनी याचे संकेत दिलेत. टोमॅटोच्या पिकावर सध्या एका प्रकारच्या किडीने हल्ला केला आहे. टूटा एब्सलुटा (Tuta absoluta) असं या किडीचं नाव आहे. मागच्या तीन वर्षांपासून टोमॅटोवर हा रोग पडतोय. यामुळे शेतकऱ्यांनी यंदाही टोमॅटो महाग होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये टोमॅटोच्या किमती वेगवेगळ्या आहेत. सध्या या किमती 25 रुपये किलोपासून ते 40 रुपये किलोपर्यंत आहेत. टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यास या किमती आणखी वाढतील. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात टोमॅटो मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मात्र, ही भाजी नाशिवंत आहे. ती फार काळ टिकत नाही. त्यामुळं ही साठवून ठेवणं शक्य नाही. त्यामुळे ते कोणीही एका वेळेस जास्त प्रमाणात खरेदी करत नाही. यामुळं देखील टोमॅटोचा पुरवठा कमी झाला की दर लगेच वाढतात. काय आहे शेतकऱ्यांचं म्हणणं ऑल इंडिया व्हेजीटेबल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले की, या किडीमुळे टोमॅटो खराब होतात. या किडीवर अद्याप उपाय निघालेला नाही. ही कीड एकदा शेतामधल्या टोमॅटोला लागली की, सगळे टोमॅटो खराब करून टाकते. यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होऊन दर वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. कोणत्याही कंपनीच्या टोमॅटोच्या बियांपासून उगवलेल्या टोमॅटोंना ही कीड लागते. तसंच, जिथल्या टोमॅटोची लागवड मार्च-एप्रिल महिन्यात झाली आहे, तिथेही या किडीचा प्रादुर्भाव दिसून आलाय. यामुळे टोमॅटोच्या किमती वाढणार आहेत. शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांसाठी नुकसान टोमॅटो ही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाणारी भाजी आहे. याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. मात्र, साठवण्याच्या सुविधेचा अभाव असल्यानं याच्या दरांमध्ये सर्वात जास्त चढ-उतार पाहायला मिळतात. अगदी एका-एका महिन्याच्या अंतरानेही टोमॅटो कधी 4 ते 5 रुपये किलो दराने होऊ शकतात. नंतर लगेच काही दिवसांनी अचानकपणे शंभर रुपये किंवा त्याहीपेक्षा अधिक किलोचा भाव होऊ शकतो. अशा पद्धतीनं काही वेळा शेतकऱ्यांना नुकसान होतं; तर, काही वेळेस ग्राहकांना. ऋतुबदलाचा या भाजीवर काही ना काही प्रभाव पडतो. यामुळे वर्षभरात टोमॅटोचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत नाही. हे वाचा -  महागाईने त्रस्त नागरिकांचा प्रवासही महागला, Ola-Uber च्या भाडे दरात वाढ मागच्या वर्षी शेतकऱ्यांना अक्षरशः टोमॅटो फेकून द्यावे लागले होते महाराष्ट्र टोमॅटो उत्पादकांपैकी एक प्रमुख राज्य आहे. इथे मागच्या सात आठ महिन्यात टोमॅटोच्या दरांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. मागील वर्षी इथे काही भागांत पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आंध्र प्रदेशातही अशी स्थिती होती. यामुळे टोमॅटोचा भाव बराच वाढला होता. तर, महाराष्ट्रातच नाशिक आणि पुणे जिल्ह्यात भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावे लागले होते. त्यावेळेस टोमॅटोचा दर 2 रुपये किलोपर्यंत खाली आला होता. हे वाचा -  Hyperthermia | उष्माघातामुळे जाऊ शकतो जीव, बचावासाठी अशी घ्या काळजी यंदा हेही ठरू शकतं दरवाढीचं कारण इंधन दरात वाढ झाल्यामुळेही या वर्षी भाज्या महाग झाल्या आहेत. भाज्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्याच्या दरात वाढ झाल्यामुळे हा परिणाम दिसत आहे. सध्या मुंबईत टोमॅटो 40 रुपये किलो दराने विकला जातोय. तर, लिंबू तब्बल 250 ते 300 रुपये किलोवर पोहोचलं आहे. सध्या कांद्याचे भाव उतरले आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव चार ते पाच रुपये प्रति किलो दराने कांदा विकावा लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात