मुंबई, 13 एप्रिल : राज्यात उन्हाचा पारा (Temperature) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यासह देशातल्या अनेक शहरांत उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येतोय. या भागात काही दिवस उकाडा आणि मोठ्या प्रमाणात ऊन पडणार आहे, त्यामुळे उष्माघात होऊ शकतो. म्हणून नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात हा हायपरथर्मिया (Hyperthermia) म्हणजेच उकाड्याशी संबंधित आजाराचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये शरीराचे तापमान असामान्यपणे वाढते. परिणामी उष्माघात झाल्यास अनेक शारीरिक लक्षणं दिसतात. हायपरथर्मियामुळे हिट एक्सॉशन होऊ शकतं, हा आजार जास्त गंभीर नसतो. परंतु, उष्माघात झाल्यास माणूस गंभीर होऊ शकतो, त्यामुळे त्यावर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं. उष्माघात झाल्यानंतर लगेच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. उष्माघाताची सामान्य लक्षणं कोणती? उष्माघाताची लक्षणं हीट एक्सॉशन सारखीच असतात, परंतु ती अधिक तीव्र असतात. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि मळमळ ही सामान्य लक्षणं आहेत. उष्माघात सुरू होण्यापूर्वी घाम येणं थांबतं, परंतु, हे नेहमीच होईल, असं नसतं. त्यामुळे अशी लक्षणं दिसली की खबरदारी घ्या. Mulberry: छोटंस दिसणारं हे फळ किडनी, फुफ्फुसांसह त्वचा विकारांवरही आहे भारी उष्माघाताचा मेंदू आणि किडनीवर परिणाम होतो का? शरीराचं तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढल्यास उष्माघात होऊ शकतो. उन्हात जास्त वेळ उभं राहिल्यानं उष्माघात होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. शरीराच्या उच्च तापमानाच्या कालावधीनुसार, वेळेत उपचार न केल्यास ते मेंदू (Brain) किंवा किडनीसारख्या (Kidney) महत्त्वपूर्ण अवयवांना कायमचे नुकसान पोहोचवू शकतं. शिवाय व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. 5 वर्षांखालील मुलं, 65 वर्षांवरील व्यक्ती आणि गर्भवती महिलांना उष्माघाताचा सर्वाधिक धोका असतो. दिवसभर उन्हात काम केल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. या संदर्भात दैनिक जागरणने वृत्त दिलंय. उष्माघातापासून बचावासाठी उपाय उष्माघात झाल्यास, सावलीत जाण्याने किंवा पाणी पिण्याने फारसा काही फरक पडणार नाही. उष्माघात टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे सावलीत राहणं आणि भरपूर पाणी (Water) पिणं. तुम्ही उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. उन्हात बाहेर पडणं टाळा. अगदीच महत्वाचं काम असेल तर जाताय तिथे सावली आणि वातावरण थंड आहे, याची खात्री करून घ्या. अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच! कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा दरम्यान, उन्हाळ्यात शरीराला जास्त घाम येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा होऊ शकतं. डिहायड्रेशनमुळे आपल्याला चक्कर येणं, थकवा येणं, डोकेदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दिवसभर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात द्रवपदार्थांचं सेवन वाढवा. नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, रस यांचं सेवन करा. ही सर्व पेयं शरीरात पाण्याची कमतरता होऊ देणार नाहीत आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.