जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली Rahul Tripathi ला संधी, पुणेकरानं दिली भावुक प्रतिक्रिया

टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली Rahul Tripathi ला संधी, पुणेकरानं दिली भावुक प्रतिक्रिया

टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली Rahul Tripathi ला संधी, पुणेकरानं दिली भावुक प्रतिक्रिया

आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (India Tour Of Ireland) घोषणा बीसीसीआयनं केली आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात पहिल्यांदाच पुणेकर राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) निवड झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची  (India Tour Of Ireland) घोषणा बीसीसीआयनं केली आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात पहिल्यांदाच पुणेकर राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) निवड झाली आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये राहुलनं दमदार कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर राहुलला ही संधी मिळाली आहे. या निवडीनंतर राहुल भलताच खूश असूनआपलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्यानं व्यक्त केली आहे. 31 वर्षांचा राहुल त्रिपाठी आयपीएल  (Indian Premier League) इतिहासात सर्वात जास्त रन करणारा अनकॅप्ड बॅटर आहे. त्यानं आत्तापर्यंत 1798 रन केले आहेत. या यादीमध्ये मनन व्होरा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 1073 रन केले आहेत. तर 798 रनसह मनविंदर बिस्ला तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2022 मध्ये राहुलनं सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळताना 14 सामन्यात 413 रन केले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 158. 24 इतका होता. टीम इंडियात निवड झाल्यानंतर राहुलनं पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘माझ्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. निवड समितीनं माझ्यावर विश्वास दाखवल्याचा मला आनंद आहे. हे माझ्या कष्टाचे फळ आहे. मला खेळण्याची संधी मिळाली तर मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल’ आयर्लंड दौऱ्यात टीम इंडिया 2 टी 20 सामने खेळणार असून ते सामने 26 आणि 28 जून रोजी हे सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियात निवड न झाल्यानं आयपीएलचा हिरो दुखावला, हार्दिकच्या सहकाऱ्यानं व्यक्त केली नाराजी आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम हार्दिक पांड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन),  इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात