Home /News /agriculture /

sugarcane farmer : शेतकरी चिंतेत! राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

sugarcane farmer : शेतकरी चिंतेत! राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

राज्यात अद्यापही 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. (sugarcane farmer) हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.

  मुंबई, 22 मे : राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने (sugar factory) जवळ असुनही उसाला तोड (sugarcane farmer) येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे.

  दरम्यान राज्यात अद्यापही 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. (sugarcane farmer) हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी  याबाबत माहिती दिली. राज्यात अजूनही बीड, उस्मानाबाद, यासह 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.

  हे ही वाचा : Nashik Murder : भिशीचे पैसे भरण्यावरुन वाद, पत्नीने पतीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव

  सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे 17.5 लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस 31 मे पर्यंत गाळप केला जाईल. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले.  इतर राज्यातून 129 हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या 29 हार्वेस्टर काम करत असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली.

  साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांचा हंगाम जूनचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. परंतु बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा असल्याने, कारखान्यांमधील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून उसतोडणी आणि गाळप लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत गाळप होणार आहे.

  हे ही वाचा : Raj Thackeray: "मातोश्री बंगला हा काय मशीद आहे का?" राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला सवाल

  गायकवाड म्हणाले की, मान्सून येण्यापूर्वी कारखान्यांचे गाळप पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने योजना आखली आहे. या हंगामात, मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे पीक नुकसानीत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारला उभ्या पिकासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार जालन्यातील 1 लाख टन ऊस गाळपासाठी अहमदनगर, परभणी, बुलढाणा आणि औरंगाबाद येथील सहा कारखान्यात हा ऊस गाळप केल्यास परिस्थिती नियंत्रणात येणार आहे.

  तसेच उस्मानाबादमधून ७५ हजार टन ऊस सोलापूरला, तर औरंगाबादहून ६१ हजार टन ऊस इतर भागात वळवण्यात येणार आहे. साताऱ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या जरंडेश्वर कारखान्यामध्ये ३० हजार टन उसाचे गाळप होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Sugar facrtory, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production, शेतकरी

  पुढील बातम्या