नाशिक, 22 मे : दिवसेंदिवस इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत की, नात्यांवरचा विश्वास उडत असल्यासारखी स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातून पती-पत्नीच्या
(Wife Husband) नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये वाद
(Husband Wife Dispute) झाला. यानंतर या वादाचे रुपांतर अत्यंत टोकाच्या स्वरुपात झाले. या घटनेत एकाचा मृत्यू
(Death) झाला आहे.
नेमकं काय घडलं -
भिशी भरण्यासाठी पैसे मागून पती वाद घालत होता. तसेच दारु पिऊन शिवीगाळ करत होता. या वादात पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
(Wife Killed Husband) ही घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे उघडकीस आली. सीताराम लक्ष्मण गायकर असे मृताचे नाव आहे. मृताचे वय 42 होते. तर वनिता गायकर असे आरोपी पत्नीचे नाव आहे. वनिता गायकरने आपला पती सीताराम याची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या पतीने आत्महत्या
(Suicide) केल्याचा बनाव वनिताने केला होता. मात्र, तिचा हा बनाव उघडकीस आला.
सीताराम लक्ष्मण गायकर हे मूळचे इगतपुरी
(Igatpuri) तालुक्यातील आहुर्ली येथील रहिवासी होते. मात्र, ते मुसळगाव हायस्कुल येथे वॉचमन म्हणून कामाला होते. पत्नी वनिता हिच्याकडे भिशी भरण्यासाठी पोस्टातील आरडीमधून सहा हजार रुपये मागितले होते. या कारणावरुन या पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. याच वादातून बुधवारी रात्रीच्या सुमारास पत्नी वनिता हिने फेट्याच्या दोरीच्या साहाय्याने तिचा पती सीतारामचा गळा आवळून खून केला.
(Husband Murder by Wife)
हेही वाचा - एकाच घरात आढळले 3 मृतदेह; गेल्या वर्षी पतीचा मृत्यू, आता तिघांनी संपवलं जीवन
पतीने आत्महत्या केल्याचा बनाव
वादाचे रुपांतर हत्येत झाले. पतीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केली, असा बनाव पत्नीने केला होता. मात्र, तिचा हा बनाव उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.