Home /News /agriculture /

Monsoon Update : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मान्सून नाहीच, मग आहे कुठे मान्सून?

Monsoon Update : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मान्सून नाहीच, मग आहे कुठे मान्सून?

राज्यात मान्सूनला सुरुवात झाला असली तरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाऊस नाही

राज्यात मान्सूनला सुरुवात झाला असली तरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाऊस नाही

मान्सून (monsoon update) राज्यात कोकणात मान्सूनला (Konkan monsoon rain) सुरूवात झाली असली तरी राज्यातील काही भागात पोहोचण्यासाठी विलंब लागत आहे.

  मुंबई, 15 जून : मान्सून (monsoon update) राज्यात कोकणात मान्सूनला (Konkan monsoon rain) सुरूवात झाली असली तरी राज्यातील काही भागात पोहोचण्यासाठी विलंब लागत आहे. दरम्यान कालपासून नंदूरबार, जळगाव, परभणी या परिसरात मान्सूनच्या (nandurbar Jalgaon, parbhani heavy)  पावसाला सुरूवात झाली. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याचे imd कडून सांगण्यात आले आहे. परंतु कोकणानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात मान्सूनला सुरूवात होते यंदा मात्र मान्सूनचा पाऊस या भागात झाला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (Kolhapur sangli no rain monsoon) यामुळे शेतकरी खरिपाची पेरणी (farmer kharip sowing) करण्यासाठी थांबला आहे. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार 75 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

  यंदा मान्सून लवकर दाखल होणार वेळेआधी कोकणासह मुंबई, (Mumbai, pune rain) पुणे, कोल्हापूर आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. परंतु यावेळी मान्सून तीन दिवस उशिरा सुरू झाला. 10 जूनला कोकणात पोहोचलेला मॉन्सून 11 जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला.

  हे ही वाचा : 'हे राजकारण नाही तर दुसरं काय?' जागोजागची पोस्टर्स पाहून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर अयोध्येच्या महंतांचा आक्षेप

  निम्म्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग  तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. शुक्रवारपर्यंत (ता. 17) गुजरातच्या आणखी काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागासह झारखंड, ओडिशा, बिहार  काही भागातही मॉन्सून प्रगती करण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

  राज्यात विवीध भागात झालेला पाऊस

  दरम्यान मागच्या 24 तासांत राज्याच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात लांजा 50, वैभववाडी आणि मालवण 30, रत्नागिरी, देवगड आणि मंडणगड 20. मध्य महाराष्ट्रातील मालेगाव 80, जुन्नर 60, नंदूरबार, नेवासा येथे 40. मराठवाड्यात पालम, परळी आणि वैजनाथ 50, मानवत आणि मुखेड 40, आंबाजोगाई, देगलूर, चाकूर आणि गंगापूर येथे 30, माजलगाव, औरंगाबाद, वाडवणी, पाथरी आणि कंधार येथे प्रत्येकी 20. विदर्भ जेवती, वणी, झरीझमणी, आष्टी येथे प्रत्येकी 10 मिमी पावसाची नोंद झाली.

  हे ही वाचा : पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश, "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" चा मोर्चात नारा

  हवामान खात्याच्या माहितीनुसार तापमान

  राज्यातील विविध शहरात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे 32.9, नगर 39, धुळे 34, जळगाव 38.3, कोल्हापूर 31.6, महाबळेश्वर 24.5, नाशिक 33.7, निफाड 38.2, सांगली 32.9, सातारा 33.3, सोलापूर 33.3 सांताक्रूझ 34.4, डहाणू 35.6, रत्नागिरी 32.5, औरंगाबाद 34.6, परभणी 37, अकोला 37.9, अमरावती 38, बुलडाणा 35.2, ब्रह्मपुरी 41.2, चंद्रपूर 39.2, गोंदिया 40, नागपूर 40.6, वर्धा 40, यवतमाळ 38.5 तापमानाची नोंद झाली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Weather, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या