Home /News /agriculture /

Palm oil : गहू, साखर, तांदळानंतर 'या' क्षेत्रात भारत होणार आत्मनिर्भर, उत्पादन वाढवण्यासाठी राबवल्या योजना

Palm oil : गहू, साखर, तांदळानंतर 'या' क्षेत्रात भारत होणार आत्मनिर्भर, उत्पादन वाढवण्यासाठी राबवल्या योजना

भारतात खाद्यतेलाचे (Edible oil rate) भाव प्रचंड वाढल्याने सामान्यांच्या चांगलाच फटका बसत आहे. दरम्यान भारत देश खाद्यतेलाच्या बाबतीत परदेशावर अवलंबून आहे.

  नवी दिल्ली, 28 मे : सध्या भारतात खाद्यतेलाचे (Edible oil rate) भाव प्रचंड वाढल्याने सामान्यांच्या चांगलाच फटका बसत आहे. दरम्यान भारत देश खाद्यतेलाच्या बाबतीत परदेशावर अवलंबून आहे. यामुळे आपल्याला दुसऱ्या देशांकडून तेल आयात करावे लागते. सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलापैकी 60 टक्क्यांहून अधिक खाद्यतेल विदेशातून  (in India More than 60 per cent of edible oils are imported)आयात करतो, त्यापैकी सुमारे 50 टक्के पाम तेल आहे. (Palm oil) एकूणच, भारत इंडोनेशिया आणि मलेशिया येथून आयात केलेल्या पाम तेलापासून खाद्यतेलाची देशांतर्गत गरज भागवतो.

  भारताचे पूर्णपणे खाद्यतेलांवरील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात पाम तेलाच्या उत्पादवाढीचा विचार होत आहे. या संदर्भात भारत सरकार तेलबियांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. त्यामुळे देशात यंदा मोहरी आणि सूर्यफुलाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्याचबरोबर पामतेलाचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्नही होत आहेत. यामध्ये केरळ सरकारने पाम तेलाचे उत्पादन दुप्पट करण्याची घोषणा केली आहे.

  हे ही वाचा : Weather update : पुढच्या 72 तासांत monsoon केरळमध्ये दाखल होणार, राज्यातील 'या' भागांना वादळी पावसाचा Alert

  पाच वर्षांत दुप्पट उत्पादन करण्याचे लक्ष्य

  केरळची पुढच्या ५ वर्षांत पामतेलाचे उत्पादन वाढवण्याची योजना आहे. त्याअंतर्गत केरळ राज्यात पामतेलाचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. 2023 पर्यंत राज्यातील पामचे क्षेत्र 65 हेक्टरने वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यानंतर  2027-28 पर्यंत, राज्यातील पाम लागवडीखालील क्षेत्र तब्बल 6,500 हेक्टरपर्यंत वाढवण्याचे या सरकारचे उद्दीष्ट आहे.​ प्रामुख्याने कोल्लम येथील ऑइल पाम इंडिया, कोट्टायम येथील प्लांटेशन कॉर्पोरेशन ऑफ केरळ (पीसीके) आणि 13 जिल्ह्यांमध्ये वितरीत केलेल्या वैयक्तिक उत्पादकांच्या माध्यमातून पामतेलाचे उत्पादन केले जाणार आहे. केरळमध्ये दरवर्षी 2.5 दशलक्ष टन पाम तेलाचे उत्पादन केले जाते.

  शेतकऱ्यांना पाम उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार

  केरळ सरकार आणि ऑइल पाम इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाने खाद्यतेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन राज्यात लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांना अनुदानासह अनेक योजना राबवण्यात येणार आहेत. याअंतर्गत राज्यातील रबर आणि इतर पारंपारिक पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्याय म्हणून पाम लागवड करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पाम ऑइल इंडियाने केरळमधील येरूर, चित्रा आणि कुलथुपुझा येथील 3646 हेक्टर क्षेत्रात पाम लावण्याची योजना आखली आहे.

  हे ही वाचा : Ajit Pawar : अजितदादांचा शेतीविषयक अभ्यास आणि कामाच्या स्टाईलपुढे कृषी अधिकाऱ्यांची भंबेरी

  इंडोनेशियाने निर्यात बंदीनंतर देशात तेलाचे भाव वाढले

  भारताच्या देशांतर्गत खाद्यतेलाच्या गरजांमध्ये पाम तेलाची महत्त्वाची भूमिका आहे. यापूर्वी पाम तेलाचा अव्वल निर्यातदार इंडोनेशियाने देशातून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्याचा परिणाम भारतातील बाजारांवर दिसून आला होता. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. इंडोनेशिया सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर देशातील खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली होती.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Kerala

  पुढील बातम्या