कोल्हापूर, 09 जून : मागच्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने (Kolhapur heavy flood) थैमान घातले. यामध्ये कित्येक जनावरे वाहून गेली. पुराने बाधित होणाऱ्या गावांत जनावरे वाहून गेली, त्यांच्या चारा पाण्याची योग्य व्यवस्था झाली नाही, तसेच पशुपालकांचा याबाबत हलगर्जीपणा सिद्ध झाला, तर संबंधित मालकांवर प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 (Animal Cruelty Prevention Act) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना (grampanchayat) देण्यात आले आहेत. ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली. (Kolhapur District Animal Husbandry Department) दरम्यान यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) यांच्याशी संंपर्क साधल्यास ते म्हणाले जर कारवाई करण्याचा आदेश निघाला तर हजारो शेतकरी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या दारात पायतान घेऊन जाब विचारणार आहे. महापूर काळात मी स्वत: महापुरात अडकलेल्या जनावरांना वाचवली आहेत. महापूर बाधित गावातील कित्येक जनावरे आम्ही मोकळ्या जागेत आणून सुरक्षित केली. शेतकरी काय मुद्दाम आपली जनावरे पुरात सोडत नाही हे अधिकाऱ्यांना कधी कळणार अशा असे शेट्टी म्हणाले.
हे ही वाचा : IMD Monsoon Update : मान्सूनबाबत मोठी अपडेट, पुढच्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल होणार
शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना जपत असतो परंतु अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची काय अवस्था होते याची कल्पना देखील करू शकत नाही असे शेट्टी म्हणाले. घरात पाणी आल्यावर त्यांची काय तारांबळ असते ते खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना काय समजणार असेही ते म्हणाले. पुढच्या काही दिवसात अधिकाऱ्यांना सुचना केल्या जातील त्यांनी हा आदेश मागे नाही घेतल्यास स्वाभिमानी स्टाईलने त्यांनी उत्तर देऊ असे शेट्टी म्हणाले.
संभाव्य पूरस्थितीबाबत पशुसंवर्धन विभाग दक्ष असला, तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची दक्षता घ्यावी, तसेच चारा व पशुखाद्याची योग्य ठिकाणी साठवणूक करावी. जनावरे स्थलांतराअभावी पुरात वाहून गेल्यास व पशुपालकांचा हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
स्थलांतरित, छावणीतील जनावरांकरिता ग्रामस्तरावर चारा वाटप समितीचे गठण करण्यात आले आहे. याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळाबाबत नियोजन असून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील कार्यरत विविध सेवाभावी संस्था, गोशाळा, पांजरपोळ, सहकारी दूध संस्था यांनी छावणी उभारणीसंदर्भात अटी व शर्तीचा मसुदा संबंधित तहसील कार्यालयातून उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर बाधित होऊ शकणाऱ्या कुक्कुट शेडधारकांनी शेडमधील सर्व कुक्कुट पक्ष्यांची विक्री करावी किंवा कुक्कुट शेड रिकामे ठेवावेत. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.