मराठी बातम्या /बातम्या /agriculture /अटल भूजल योजना नेमकी आहे तरी काय?  या जिल्ह्याने घेतला सर्वाधिक फायदा

अटल भूजल योजना नेमकी आहे तरी काय?  या जिल्ह्याने घेतला सर्वाधिक फायदा

या जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास (Groundwater level study) करण्यासाठी पिझोमीटर (Piezometer) (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे.

या जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास (Groundwater level study) करण्यासाठी पिझोमीटर (Piezometer) (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे.

या जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास (Groundwater level study) करण्यासाठी पिझोमीटर (Piezometer) (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे.

अमरावती, 29 मे : विदर्भातील अमरावती जिल्ह्यात (Vidarbha, Amravati) पाणी पातळी (water level) तपासणीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान अटल भूजल योजनेतंर्गत (Atal bhujal Scheme) अमरावती जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास (Groundwater level study) करण्यासाठी पिझोमीटर (Piezometer) (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. याचा फायदा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या पिझोमीटरचे उद्घाटन मंत्री यशोमती ठाकूर (minister yashomati thakur) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

अत्याधुनिक पध्दतीने गावातील भूजल पातळीच्या अभ्यास करण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड, मोर्शी  व चांदुरबाजार या तालुक्यामध्ये एकूण 90 ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटरसाठी स्थळ निश्चित करण्यात आले. जमिनीतील भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा अभ्यास व तसेच भूजल पातळीचा अभ्यास अत्याधुनिक पध्दतीने करण्याकरिता पिझोमीटरने (भूजल मापक यंत्र) खोदकाम करण्यात येणार आहे व त्यावर (डिजीटल वॉटर लेवल रेकॉर्डर) बसविण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : पाया पडला अन् हात जोडले आणि आमदाराने लगावली कानशिलात, VIDEO व्हायरल

यामुळे गावाला भूजल पातळीची नोंद दर 12 तासाला घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यातील एकुण 90 ग्रामपंचायत मध्ये 90 पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. तसेच या यंत्राद्वारे गावामध्ये दरदिवशी किती पाऊस पडतो, हे मोजमाप कशाप्रकारे करतात, याचे प्रात्यक्षिक या कार्यालयमार्फत गावातील जलसुरक्षक यांना देण्यात येईल. पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्राचा उपयोग करुन गावाचा ताळेबंद अधिक अचूकतेने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा : Big News: 22 प्रवाशांना घेऊन जाणारं नेपाळचं विमान रडारवरुन Missing, प्रवाशांमध्ये 5 भारतीय

अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर  (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. ठाकूर यांच्या हस्ते आज पिझोमीटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक संजय कराड, मोर्शीचे तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

First published:

Tags: Amravati, Water, Water machin