मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Sugarcane Farmer : साखर कारखानदार अन् शेतकरी संघर्ष अटळ, कारखाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा

Sugarcane Farmer : साखर कारखानदार अन् शेतकरी संघर्ष अटळ, कारखाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा

 राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.(sugarcane farmer)

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.(sugarcane farmer)

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.(sugarcane farmer)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. काल झालेल्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (sugarcane farmer) यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात एफआरपी दोन तुकड्यात देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या निर्णयावर शेतकरी संघटनांनी जोरदार आवाज उठवला आहे. यावरून राज्यातील साखर हंगामापूर्वी संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मागच्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

हे ही वाचा : 'शिवाजी पार्क मैदान कोणाच्या...नाही'; दसरा मेळाव्यावरुन गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी 10.25 टक्के बेसिक 60 उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन 3050 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. देशात सध्या 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात 30 लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून 100 लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रीक टन आहे.

इथेनॉल निर्मितीत देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के आहे. पुढील वर्षी 325 कोटी लीटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत (ओपन जनरल लायसन्स) गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा : शिवसेनेचा निकाल निर्णायक टप्प्यावर! शिंदे निवडणूक आयोगासमोर करणार आमदारांची ओळख परेड!

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी  भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Sugar, Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production