मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Sugar Production : 7 वर्षांपासून चर्चेत असलेल्या उत्पादन डबल देणाऱ्या उसाच्या नव्या जातीला VSI कडून लवकरच मान्यता

Sugar Production : 7 वर्षांपासून चर्चेत असलेल्या उत्पादन डबल देणाऱ्या उसाच्या नव्या जातीला VSI कडून लवकरच मान्यता

वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या (Vasantdada Sugar Institute sugar seeds production) माध्यमातून बियाणांचे (new seeds) नवनवीन प्रयोग घेतले जात आहेत.

वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या (Vasantdada Sugar Institute sugar seeds production) माध्यमातून बियाणांचे (new seeds) नवनवीन प्रयोग घेतले जात आहेत.

वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या (Vasantdada Sugar Institute sugar seeds production) माध्यमातून बियाणांचे (new seeds) नवनवीन प्रयोग घेतले जात आहेत.

  मुंबई, 15 जून : वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या (Vasantdada Sugar Institute sugar seeds production) माध्यमातून बियाणांचे (new seeds) नवनवीन प्रयोग घेतले जात आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना (farmer) नेहमी होत असतो. व्हीएसआयची (VSI) उत्पादने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी या व्हीएसआयच्या माध्यमातून विविध शेती उपयुक्त उत्पादने घेत असतो. दरम्यान व्हीएसआयकडून नवीन उसाच्या (new seeds sugarcane) जातीचा शोध लावण्यात आला आहे. मागच्या 7 वर्षांपासून साखर कारखान्यांच्या (sugar factory) चर्चेत असलेल्या 'को 'व्हीएसआय 18121' (co vsi 18121) या उसाच्या नवीन जातीच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. लागवडीसाठी या जातीची शिफारस 2024पर्यंत होण्याची शक्यता असल्याचे व्हीएसआयकडून माहिती देण्यात आली आहे.

  सध्या शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये 'को 86032' हे वाण जास्त प्रमाणात वापरले जाते. मात्र उत्पादन आणि उतारा या दोन्ही मुद्द्यांवर '18121 वाण' सरस ठरते आहे. या वाणावर गेल्या काही वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या दोन संस्था संयुक्तपणे संशोधन करीत आहेत.

  हे ही वाचा : State Government : राज्य सरकारचा मोठा निर्णय तुकडे बंदी कायद्यात केले हे मुख्य बदल

  'कोव्हीएसआय 18121 हे नवे वाण तयार करण्यासाठी 'को 86032' व 'कोटी 8201१' अशा दोन वाणांचा संकर घडवून आणला गेला आहे. या वाणाच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरू आहेत. 'व्हीएसआय'चे महासंचालक शिवाजीराव देशमुख व संचालक संभाजी कडू पाटील यांच्याकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे. 

  साखर उद्योगात अधिकाधिक साखर उतारा देणारी उसाची जात हाती असणे हीच मुख्य बाब समजली जाते. 'आयसीएआर'च्या कोइमतूरमधील ऊस पैदास संशोधन संस्थेचे संचालक बक्षी राम यांनी 'को-0239' हे सर्वोत्कृष्ट वाण शोधले. हे वाण उत्तर प्रदेशाने स्वीकारल्यानंतर सरासरी उत्पादन हेक्टरी 80 टनाच्या पुढे गेले. त्यामुळे तेथील साखर उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे.

  हे ही वाचा : Fertilizer Company : भाजपच्या माजी सहकारमंत्र्यांच्या खत कंपनीसह राज्यातील 6 कंपन्यांवर मोदी सरकारकडून फौजदारीचे आदेश

  2018 मध्ये 'व्हीएसआय'ने पाण्याचा ताण सहन करणारी '08005' ही उसाची नवी जात प्रसारित केल्यानंतर राज्याच्या दुष्काळी भागात उसाची लागवड वाढली. यानंतर व्हीएसआयने 18121 वाणाच्या चाचण्या अजून काही महिने चालतील असे सांगितले आहे. त्यानंतर विद्यापीठांच्या चाचण्यांसाठी पूर्वप्रसारित होईल. 2024 ते 25 पर्यंत या वाणाच्या गाळप चाचण्या होतील. त्यातील निष्कर्ष पाहूनच सार्वत्रिक लागवडीसाठी शिफारस केली जाईल, अशी माहिती 'व्हीएसआय'च्या सूत्रांनी एग्रोवनला दिली. 

  को- व्हीएसआय 18121' हे नवे ऊस वाण २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे असे उद्दिष्ट ठेवत शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत. या वाणाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. कारखाना चाचण्यांमध्ये (मिल्स ट्रायल्स) वाण यशस्वी ठरल्यास राज्याच्या साखर उद्योगाला बळकटी मिळू शकते.

  - डॉ. रमेश हापसे, मुख्य शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग, व्हीएसआय

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

  पुढील बातम्या