मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Soybean Rate : शेतकऱ्यांचे सोने सोयाबीनला यंदा भाव तेजीत, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी

Soybean Rate : शेतकऱ्यांचे सोने सोयाबीनला यंदा भाव तेजीत, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी

सोयाबीनला चांगला भाव (soybean market rate)  मिळत आहे. यंदाच्या हंगामात किरकोळ दिवस सोडले तर सोयाबीनच्या भावाला कायम तेजी दिसून आली आहे.

सोयाबीनला चांगला भाव (soybean market rate) मिळत आहे. यंदाच्या हंगामात किरकोळ दिवस सोडले तर सोयाबीनच्या भावाला कायम तेजी दिसून आली आहे.

सोयाबीनला चांगला भाव (soybean market rate) मिळत आहे. यंदाच्या हंगामात किरकोळ दिवस सोडले तर सोयाबीनच्या भावाला कायम तेजी दिसून आली आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 12 जून : राज्यात यंदा सोयाबीनला चांगला भाव (soybean market rate)  मिळत आहे. यंदाच्या हंगामात किरकोळ दिवस सोडले तर सोयाबीनच्या भावाला कायम तेजी दिसून आली आहे. दरम्यान या मिळणाऱ्या भावामुळे अस्मानी संकट आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना (farmer) मात्र तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. याचबरोबर मागच्या चार दिवसांपासून सोयाबीनला चांगला भाव (soybean rate hike) मिळत असला तरी यंदाच्या खरीप हंगामात (kharif season) सोयाबीन उत्पादन वाढणार (soybean production hike) असल्याचे कृषी विभागाकडून (agriculture department) देण्यात आली आहे.

यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतांची मशागत करून ठेवली असली तरी पेरणी सारखा पाऊस झाला नसल्याने पेरणीची घाई करू नये असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान नागपूरमध्ये मॉन्सून लांबल्याने शेतकऱ्यांसह प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील सर्वांचीच चिंता वाढली आहे. परिणामी, सोयाबीनला चांगलाच भाव मिळत आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनची 386 क्विंटल आवक झाली असून, दर 5 हजार 300 ते 6 हजार 290 रुपयांवरून 5 हजार 500 ते 6 हजार 450 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे ही वाचा : पराभवानंतर सेनेचं आत्मचिंतन? राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काळजी घ्या, मंकीपॉक्स हवेतून पसरतोय TOP बातम्या

नागपूरच्या कळमना बाजार समितीत गेल्या महिन्यात सोयाबीनचे दर चांगले तेजीत होते. त्यानंतर दरात घसरण अनुभवण्यात आली. आता पुन्हा सोयाबीन दरात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत आहे. महाराष्ट्रातील 100, मध्य प्रदेशमधील 75 तर राजस्थानमधील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटलमागे 50 रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. बाजारातील ही स्थिती पाहता येत्या काळात सोयाबीनचे दर आणखी तेजीत राहतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुरेसे सोयाबीन उपलब्ध सोयाबीन मंडळ

सध्या मार्केटमध्ये सोयाबीनची आवक थांबली आहे यामुळे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र सोयाबीनची उपलब्धता पर्याप्त असल्याचा दावा केला आहे. ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या कालावधीत सोया डिओसीच्या निर्यातीमध्ये 69.30 टक्के घट झाली.

हे ही वाचा : Sanjay Raut: "... तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील" : संजय राऊत

5.50 लाख टन इतकीच सोया डिओसी निर्यात झाल्याचे 'सोपा'चे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 17.90 लाख टन इतकी निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात आठ महिन्यांच्या कालावधीत 71 लाख टन इतकीच आवक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 79.75 लाख टन आवक झाली होती.

First published:

Tags: Farmer, Soyabean rate, Soyabean rate in maharashtra