मुंबई, 13 मे : मागच्या दोन वर्षांपासून देशाच्या अनेक राज्यात शेतकऱ्यांचे (farmer issues in Maharashtra) अस्मानी संकटाने (Farmers under Crisis ) मोठे नुकसान झाले आहे. कुठे उन्हाच्या तडाख्याने पीक वाळून नुकसान तर कुठे पाण्याची तीव्र टंचाई यामुळे देशातील अनेक राज्यात शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाळून जात आहेत. यामुळे कृषी क्षेत्राच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. यंदा एप्रिलपासूनच सूर्य आग ओकू लागला आणि त्याची सर्वाधिक झळ विदर्भातल्या शेतकऱ्यांना बसली आहे. एकीकडे भीषण उन्हामुळे उभं पीक करपतंय तर दुसरीकडे जमिनीला ओलावा द्यायला पाणीही देता येत नाही, कारण भारनियमन आणि वीजटंचाई.
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील (akola district farmer) दानापूर गावचे श्याम ढाकरे यांची 5 एकर शेती (farmer) आहे. मागच्या काही वर्षांपासून त्यांच्या पिकाची झालेली अवस्था CNBC शी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांच्या शेतीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून केळीची शेती (banana farmer) केली होती त्यामध्ये त्यांना 5 लाखांच्या वर उत्पादन मिळणे अपेक्षित होते परंतु केळीचं संपूर्ण पीक उन्हाने करपून गेले तर पाण्याअभावी पिकाची वाढ झालीच नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी देण्याची व्यवस्था विस्कळीत झाल्याने ढाकरे यांची परिस्थिती बिकट बनली आहे.
हे ही वाचा : Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात, दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू
ढाकरे म्हणाले की, 'उष्णतेमुळे पिकाचं नुकसान झालं आहे. केळीच्या झाडांना संरक्षण देण्यासाठी सेडनेट वापरण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु तापमान इतके जास्त आहे की त्याचाही काही फायदा होत नाही. तसेच, केळीच्या झाडांना भरपूर पाणी लागते परंतु भारयनियमनामुळे वीजपुरवठा खंडित झाला की पाण्याची सोय होत नाही.'
ही परिस्थिती फक्त केळी बागायतदारांचीच नाही तर अमरावती जिल्ह्यातील संत्रा शेतकऱ्यांच्या वाट्यालाही संघर्ष हा आला आहे. अरुण जुमले या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांने 5 लाख रुपये खर्चून संत्र्याचं पीक घेतलं आहे परंतु यंदाही त्यांच्यां वाट्याला संत्र्याचे फळ म्हणावे तसे न आल्याने यावर्षी देखील संत्री तोडणार नाहीत.
एका झाडावर 3 ते 4 हजार संत्री लागतात. मात्र यंदा उष्णतेमुळे फळे सुकली असून, सध्या एका झाडाला 200 ते 300 संत्री मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे जुमले यांनी सांगितले. हीच परिस्थिती पपई, भुईमूग, टोमॅटो, भेंडी, गहू, आंबा अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान यात राज्य सरकार विचारल्यास परिस्थितीचा अभ्यास करत आहोत, परंतु अद्याप कोणतेही ठोस या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, वातावरण बदलामुळे पीक उत्पादनात घट झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान अथवा मदत देण्यात आली नाही.
हे ही वाचा : महागाईचा भडका! 8 वर्षात सर्वाधिक वाढली महागाई; भाजी, डाळ, वीज सर्वांचेच दर कडाडले
अंदाजानुसार, केवळ गव्हासाठी, संपूर्ण भारतामध्ये सुमारे 4,500 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते आणि उत्पादनात 3-4 टक्के घट होऊ शकते. इतर पिकांचे नुकसानीचे अंदाज अद्याप काढले नाहीत परंतु प्राथमिक माहितनुसार नुकसानीचा आकडा मोठा असेल. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे या वर्षीचे हवामान आणि पाण्याची टंचाई यामुळे पुढील वर्षीच्या पिकांनाही अडचणी येऊ शकतात.
पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेमुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असा विश्वास CRISIL Research चे संचालक पुशन शर्मा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुढील 15 दिवस तापमानात वाढ होत राहिल्यास खरीप हंगामाच्या पीकांवर मोठा परिणाम होणार आहे. तर लवकर पेरणी केलेल्या कापूस आणि धान पिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या, शेतकरी आशा बाळगून आहेत की सरकार मदतीचा हातभार लावेल. शर्मा यांच्या माहितीनुसार शेतकऱ्याला सरकारच्या अनुदाना मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा आहे परंतु त्यांचे यावर्षी नुकसान तर होईलच, शिवाय पुढील हंगामही त्यांना परवडणार नाही, शेवटी त्यांच्या नशिबाचा भाग असल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Akola, Akola News, Farmer, Farmers protest