मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Onion Rate : क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय मंत्र्यांच्या दारात कांदा उत्पादक शेतकरी काढणार रात्र

Onion Rate : क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय मंत्र्यांच्या दारात कांदा उत्पादक शेतकरी काढणार रात्र

कांद्याबाबत सरकारने नेहमी धरसोड भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

कांद्याबाबत सरकारने नेहमी धरसोड भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

कांद्याबाबत सरकारने नेहमी धरसोड भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

  नाशिक, 02 ऑगस्ट : सध्या कांदाचे दरात कोणतीही चढ उतार नसल्याचा अंदाज घेत केंद्र सरकारकडून कांद्याबाबत तयारी सुरू केली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असते. या काळात कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जातात. त्यामुळे अनपेक्षितपणे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने कांद्याबाबत संपूर्ण आराखडा तयार केला आहे. दरम्यान कांद्याबाबत सरकारने नेहमी धरसोड भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. (Onion Rate)

  कांदा दराबाबत सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. सरकारने यापुढे आवश्यक वस्तू कायदा अथवा विदेश व्यापार कायद्यांतर्गत कांदा व्यापारात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला ८ ऑगस्टला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर लाक्षणिक रात्र - धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

  हे ही वाचा : संबित पात्रांनी केली संजय राऊतांची पोलखोल, आकडे देऊन केला मोठा खुलासा

  या दिवसापासून शेतकरी संघटनेच्या कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह आंदोलनास सुरुवात केली जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांन पत्रकार परिषदेत दिली. नाफेडच्य कांदा खरेदीबाबतही संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या नावाच यादी मागितली आहे.

  सध्या देशात कांदाचे दर दरात कोणतीही चढ उतार नसल्याचा अंदाज घेत केंद्र सरकारकडून कांद्याबाबत तयारी सुरू केली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असते. या काळात कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जातात. त्यामुळे अनपेक्षितपणे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने कांद्याबाबत संपूर्ण आराखडा तयार केला आहे. कांद्याचे दर कमी असल्याचा फायदा घेत आधीच कांदा खरेदीकरून व्यवस्थित साठवला आहे.

  हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार

  सरकारने 2022-23 मध्ये बफर स्टॉक तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 2.5 लाख टन कांदा खरेदी केला आहे आणि कांद्याच्या किरकोळ किमती वाढल्यास हा साठवलेला कांदा पुरवठा करण्याच्या तयारीत केली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी 26.64 दशलक्ष कांदा उत्पादन झाले होते.  यंदा हे उत्पादन 37.17 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असल्याची महिती देण्यात आली आहे.

  कांद्याचा बफर स्टॉक वाढला

  अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मागील विक्रम मोडीत काढत केंद्राने 2022-23 या वर्षात बफर स्टॉकसाठी 2.50 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. चालू वर्षातील कांद्याच्या बफर स्टॉक 2021-22 मध्ये तयार केलेल्या 2 लाख टनांपेक्षा 50 हजार टन अधिक आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Nashik, Onion, Priceonion

  पुढील बातम्या