जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या दारात; एंट्रीसाठी कधीचा मुहूर्त साधणार

Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या दारात; एंट्रीसाठी कधीचा मुहूर्त साधणार

Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या दारात; एंट्रीसाठी कधीचा मुहूर्त साधणार

राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा पाऊस 106 टक्के पडणार आहे. तसेच उर्वरित भागात 99 टक्क्यांपर्यंत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आली आहे. काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (monsoon update)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जून : राज्यात यंदा जोरदार पाऊस (heavy rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (imd alert) वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर राज्यात मान्सूनची चाहूल लागत आहे. (monsoon update in Maharashtra) राज्यातील कोकण आणि गोव्याच्या सीमेवर (Konkan, goa border) मान्सून पुढच्या दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा पाऊस 106 टक्के पडणार आहे. तसेच उर्वरित भागात 99 टक्क्यांपर्यंत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आली आहे.

जाहिरात

दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगावमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या स्थितीचा प्रभाव अनुकूल राहिल्याने मान्सूनच्या आगमनाला कोणताही अडथळा नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात पोहोचणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात झाली होती.

हे ही वाचा :  Puntamba Farmer Protest: पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन

दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून ते उत्तर केरळ व उत्तर कर्नाटकची किनारपट्टी ते पुढे दक्षिण बंगालची किनारपट्टी तसेच दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत (केरळ व तामिळनाडूची किनारपट्टी पार करून) चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच हरियाणापासून बांगला देशपर्यंत, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार, झारखंड, गॅगस्टीक, पश्चिम बंगाल पार करून आणखी एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितींमुळे मान्सूनचा पुढील प्रवास सोपा झाला आहे.

जाहिरात
जाहिरात

मान्सून केरळमध्ये (Monsoon arrives in Kerala) दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागा (IMD)कडून दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान यंदा देशात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता

हवामान विभागाचा मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सून (Monsoon in Maharashtra) कधी दाखल होतो याची सर्वजण वाट पाहू लागले आहेत. पण त्याच दरम्यान स्कायमेटने (Skymet) भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मान्सून खरंच केरळात दाखल झाला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

भारतीय हवामान खात्याने सर्व तपासणी न करता मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. एका दिवसाच्या निरीक्षणाद्वारे घोषणा करणं अयोग्य आहे असं खाजगी हवामान अंदाज वर्तक स्कायमेटने म्हटलं आहे. मात्र, आयएमडीने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात