Home /News /maharashtra /

Puntamba Farmer Protest: पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन

Puntamba Farmer Protest: पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन

puntamba farmers agitation over various demands: अहमदनगरमधील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे.

अहमदनगर, 1 जून : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पुणतांबा गावातून (Puntamba Village) पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन (Farmers agitation) सुरू झालं आहे. शेतात ऊस उभा आहे, कांद्याला भाव नाही, द्राक्ष टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे तर विजेच्या संकटाने शेतकरी त्रस्त झाले आहेत असं असूनही सरकार दखल घेत नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पुणतांबा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटली पुणतांबा येथे बळीराज्याच्या पुतळयाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. बळीराजाच्या पुजनानंतर गावातून कृषी दिंडी काढून धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे हे धरणे आंदोलन 5 दिवस सुरू राहणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. 5 जून पर्यंत राज्य सरकारने आपल्या समस्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल अशीही शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. वाचा : मुंबई-पुण्यातही मधमाशी पालनाचा व्यवसाय करता येणार, घरबसल्या असे मिळवा आर्थिक फायदे आंदोलकांच्या मागण्या काय? 1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे... 2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे... 3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा... 4) कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे... 5) शेतकऱ्यांना दिवसा पुर्णदाबाने वीज मिळावी... 6) थकित वीज बिल माफ झाले पाहिजे... 7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी... 8) सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा... 9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी... 10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे... 11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा... 12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा... 13) खाजगी दुध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी... 14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी... 15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे... 16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमीनी नावावर केल्या जाव्यात. 2017 मध्ये पुणतांब्यात शेतकऱ्यांचं आंदोलन पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये याच पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या आंदोलनानंतर राज्यभर शेतकरी आंदोलन सुरू झाले होते. ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झालेल्या अहमदनगरमधील पुणतांब्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आपल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात पाच दिवस हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Farmer, Farmer protest

पुढील बातम्या