Home /News /agriculture /

ऊसतोड मजुरांचे अपहरण करुन मुकादमाकडून अमानुष मारहाण, पती-पत्नीला बळजबरीने पाजले विष

ऊसतोड मजुरांचे अपहरण करुन मुकादमाकडून अमानुष मारहाण, पती-पत्नीला बळजबरीने पाजले विष

गेवराई तालुक्यातील (gevrai tehsil) उसतोड मजूर (sugarcane) दांपत्याला मुकादमाने अपहरण करुन बळजबरीने पत्नीला विष पाजून बेदम (Poisonous beating) मारहाण

  बीड, 25 जून : बीडमध्ये (beed) ऊसतोड कामगारांच्या (sugarcane labor) सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील (gevrai tehsil) उसतोड मजूर (sugarcane) दांपत्याला मुकादमाने अपहरण करुन बळजबरीने पत्नीला विष पाजून बेदम (Poisonous beating) मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. यात महिला गंभीर झाल्याने जिल्हा रुग्णालयात (beed district government hospital) उपचार सुरु आहेत. मुकादम कृष्णा पवार याने मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिसांत तक्रार देण्यात आली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथिल उसतोड मजूर शिवाजी पवार यांना उसतोडणीसाठी दीड लाख रूपये दिले होते. परंतु काही अडचणीमुळे त्यांचे उसतोडणीला जाण्याचे रद्द झाले. रद्द का केले म्हणून मुकादमाने मुद्दाम उसतोड कामगाराकडे दोन लाखाची मागणी करून बेदम मारहाण केली आहे. व पत्नी सविता शिवाजी पवार यांना देखील काही महिलांनी धरून विष प्राशन करून मारहाण केली आहे.

  हे ही वाचा : 'XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका', संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

  राज्यात यंदा 101 सहकारी आणि 99 खासगी अशा एकूण 200 कारखान्यांनी गाळपात भाग घेतला. यातील 198 साखर कारखाने 13 जूनअखेर बंद झाले आहेत. गेल्या हंगामात 190 कारखाने बंद झाले होते.

  महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात. या हंगामात महाराष्ट्रात १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला होता. यातून १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे. राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाग गाळप झाले. कोल्हापुरातील कारखान्यांमधील 2 कोटी 54 लाख 69 हजार उसापासून 3 कोटी 41 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोल्हापूर विभागात झाले.

  हे ही वाचा : गद्दार म्हटल्यामुळे तानाजी सावंत संतापले, 'औकातीत राहा' शिवसैनिकांनाच दिला इशारा

  सातारा जिल्ह्यात अद्यापही ऊस शिल्लक

  सातारा जिल्ह्यात अद्याप 20 हजार टन ऊस शिल्लक असताना सर्व कारखान्यांनी मात्र गाळप हंगामाची सांगता केली आहे. वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील 20 हजारांवर टन ऊस गाळपाविना उभा आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला जात नसल्याने पेटवून देत त्याचे जळण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शेतकरी निराश झाले आहेत. 

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Beed, Beed news, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra

  पुढील बातम्या