मुंबई, २५ जून: 'त्या आमदारांची सुरक्षा अजिबात सरकारची जबाबदारी नाही. ते महाराष्ट्रातून पळून गेले आहे. XXला पाय लावून पळाले आहे. त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी रक्षक घेऊन गेले आहे.आपल्या राज्यात या, असं वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात. असं बकरी सारखं बेबे काय करू नका.सोडून द्या हे सगळं अजूनही वेळ गेली नाही' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पत्राला सणसणीत उत्तर दलं.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्राला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पत्रकारांशी बोलत असताना जशास तसे उत्तर दिले.
'त्या आमदारांची सुरक्षा अजिबात सरकारची जबाबदारी नाही. ते महाराष्ट्रातून पळून गेले आहे. XXला पाय लावून पळाले आहे. त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी रक्षक घेऊन गेले आहे. त्यांना जी सुरक्षा असते ती आमदारांना असते. कुटुंबीयांना नसते. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या, असं वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, तुम्ही शिवसेनेचे आमदार म्हणवता ना, मग राज्यात या. असं बकरी सारखं बेबे काय करू नका. करू काही, सोडून द्या हे सगळं अजूनही वेळ गेली नाही'असं राऊत म्हणाले.
'आमच्याकडे सांगलीचे कार्यकर्ते आले आहे फक्त आदेश देण्याची वाट पाहात आहे, हे सोपं नाही हे कोणत्या पक्षात घडत आहे. मी जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने बोलतो, मी हवेत बोलत नाही. आमच्यासोबत काय आहे, किती ताकद आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहात,इथं येऊन बोला. कुणाची सुरक्षा काढली नाही. ही आमची जबाबदारी नाही. त्यांचा राग समजू शकतो. आता सांगलीचे लोक आले आहे ती भडकलेली आहे. काय करू अशी विचारात आहे. ती भडकली तर विस्फोट होईल.पण सर्वांना शांत राहण्याचे आदेश दिले आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.
'काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शुक्रवारी रात्री सुद्धा शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत आमची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदेंसोबत असलेल्या १० आमदारांनी आमच्यासोबत फोनवर चर्चा केली. आणि काय सांगता कोण कुणासोबत आहे. या महाराष्ट्रात विधानभवनात संख्याबळ सिद्ध करू, बघू कुणामध्ये किती दम आहे दिसेल' असं आव्हानच राऊत यांनी दिलं.
'मी देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला देईल,ते बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे, ते चांगले खेळाडू आहे. तुम्ही यात पडू नका, आधी सकाळी झालं होतं ना. आता संध्याकाळी होईल. तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. भाजपने जी काही प्रतिष्ठा कमावली आहे, ती धुळीला मिळवू नये. आमचे राजकीय मतभेद असले तरी चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांनी या फंद्यात पडू नये, निवडणुकीमध्ये पाहू या, उगाच तुम्ही फसाल. आम्ही आमचं पाहून घेऊ, असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.
तसंच 'राष्ट्रीय कार्यकारणी ही प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची बैठक आज बोलावली आहे. तिथे चर्चा होईल, पक्षाच्या भविष्य़ आणि विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. पक्ष हा खूप मोठा आहे. देशात हा पक्ष मोठा आहे. या पक्षाला बनवण्यासाठी आम्ही रक्त आटवले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा पक्ष उभा केला आहे. कुणाकडून पैसे घेऊन हा पक्ष उभा राहिलेला नाही. आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. कुणी तरी महाशक्ती म्हणवणारा पक्ष आमच्या पाठीमागे नाही. शिवसेना हायजॅक केलेला पक्ष नाही .आज हजारो लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. पक्ष एकसंध आहे आणि एकजूट आहे' असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.