पुणे, 05 जून : फळांचा राजा आंबा (mango) हा फक्त भारतातच नाही तर परदेशातही आदिराज्य गाजवत आहे. कोकणचा आंबा यापूर्वी पुण्यातून व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला होता. आता भारताचा आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्रीस जात आहे. (Indian Mango in America) हा आंबा अमेरिकेला समुद्रामार्गे जाणार असल्याने आंब्याचा वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार आहे. यामुळे आंबा उत्पादकाच्या हातात चार पैसे जादा राहणार आहेत.
भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, (Bhabha Atomic Research Center, Maharashtra State Agricultural Marketing Board) अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शुक्रवारी (ता.3) प्रथमच भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेला पाठवल्याची माहिती राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा : Tanaji Sawant: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात
आंब्याच्या समुद्रामार्गे अमेरिकेत जाणार असल्याने आंब्याचा वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार आहे. दरम्यान अमेरीकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरुन इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करु शकणार आहे. तसेच समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा सुमारे दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहण्याची शक्यता आहे. भारतीय आंब्याच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असून त्यामुळे आंब्याच्या निर्यातीमधे क्रांतिकारक बदल होईल, असेही सुनील पवार यावेळी म्हणाले.
भाभा ॲटोमिक रीसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या वतीने कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र येथून अमेरिकेला देशातून प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. यावेळी भाभा ॲटोमिक रेसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हे ही वाचा : विदर्भात उष्ण लाटेचा Yellow Alert, मान्सून गोव्यात मुक्कामाला IMD ची माहिती
भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शुक्रवारी (ता.3) प्रथमच भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेला पाठवले आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले.
डॉ. टी. के. घंटी यांनी कृषिमालाची निर्यात आणि कृषिमालाची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कृषी पणन मंडळास सर्वतोपरी मदत करणास असल्याचे सांगण्यात आले. संशोधनात आम्ही मोठे काम करत आहोत तथापि आमचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी पणन मंडळाने काम करावे, असे आवाहन डॉ. घंटी यांनी यावेळी केले.