हे ही वाचा : Engineer उमेदवारांनो, MahaTransco मध्ये तब्बल 223 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; चान्स सोडू नका; करा अर्ज
मागच्या महिन्यात जल व्यवस्थापनात उल्लेखनीय असं काम केल्याबद्दल सुर्डी गावाला दिल्लीत जल व्यवस्थापनाचा पुरस्कार देण्यात आला आहे. डोईफोडे यांनी शेती व शेतकर्यांच्या बाबतीत होत असलेल्या अपप्रचाराला आव्हान देत, सन 2016 -17 मध्ये आपल्या काळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये नऊ बाय पाच अंतरावर क्लोन जातीच्या बेदाणा निर्मितीसाठी वाणाची निवड केली. 2016 मध्ये रोपांची लागवड केल्यानंतर भेसळ डोस, शेणखत, मळी या खतांची मात्रा दिली. तसेच, पाचट टाकून नैसर्गिक मल्चिंग केले. गरजेनुसार डाऊनी, भुरी करपा आदी फवारणी घेण्यात आली. (Grape growers farmer) हे ही वाचा : Devendra Fadnavis vs Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिलं नवीन नाव, म्हणाले... मार्च 2017 मध्ये क्लोन जातीच्या द्राक्षांचा पहिलं पीक घेतलं. मागच्या वर्षी द्राक्षबागेची निगा राखत वार्षिक उत्पादनांमध्ये वरचेवर प्रगती केली. मार्च 2022 मध्ये तर चक्क एक एकर क्षेत्रामध्ये 6 क्विंटल 600 किलोग्राम इतके मनुक्याचे विक्रमी उत्पादन घेतले. बेदाणा निर्मितीसाठी गावामध्येच विविध योजनांमधून मिळालेल्या शेडमध्ये सोय झाल्यामूळे बेदाणा निर्मितीला सोपे पडते. बेदाणा निर्मिती झाल्यानंतर गावांमध्येच असलेल्या प्रक्रिया केंद्रामधून बेदाण्याची प्रतवारी करणेही सहज शक्य होते. बेदाण्याची प्रतवारी झाल्यानंतर तो बेदाणा विक्रीच्या उद्देशाने बाजारपेठेमध्ये पाठवला जातो. असे डोईफोडे यांचे मत आहे. हे ही वाचा : आता ऑनलाइन पाहता येईल PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांची स्थिती सांगली, तासगाव आदी बाजारपेठेत सुर्डीतील बेदाण्यास जास्त मागणी असते. बारा लाख रुपयांच्या उत्पादनामधील तीन लाख रुपये द्राक्षबागेची वार्षिक देखभाल करण्यासाठी जातात. त्यामध्ये खतांची मात्रा, फवारणी, विविध जैविक खते व इतर बाबींसाठी हा खर्च होतो. भाऊ डोईफोडे यांना बेदाणा निर्मितीच्या यशात आई सिंधू, वडील दत्तात्रय व पत्नी सारिका यांचा मोठा हातभार लागला. या सर्वांनी त्यांना बेदाणा निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण घेतलेला तरुण शेतकरी मनात आणले तर काय करू शकतो हे भाऊ डोईफोडे यांनी दाखवून दिले आहे. पूर्वी आम्ही तूर, मका यासारखी पारंपरिक पिके घेत होतो, मात्र बेदाणा निर्मितीच्या उद्देशाने आज शेतात द्राक्षबागेची लागवड केली. त्याचे लाखो रुपयांत फळ मिळल्याचे दिसत असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmers protest, Solapur, Solapur news