जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Devendra Fadnavis vs Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिलं नवीन नाव, म्हणाले...

Devendra Fadnavis vs Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिलं नवीन नाव, म्हणाले...

Devendra Fadnavis vs Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिलं नवीन नाव, म्हणाले...

भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 04 मे: भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. यावेळी फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना नवीन नाव दिलं आहे. त्यामुळे आता फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरे काय नाव देतात हे पाहावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मर्सिडीज बेबी असं नवीन नाव दिलं आहे. काय म्हणाले फडणवीस 1857 च्या युद्धात ही फडणवीस असतील या आदित्य ठाकरेंच्या टिकेला उत्तर देत फडणवीस म्हणाले की, सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला संघर्ष माहिती नाही. त्यामुळे करसेवकांची थट्टा ते नक्की उडवू शकतात. मी हिंदू आहे त्यामुळे मागच्या जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे 1857 मध्ये मी नक्की तात्या टोपे आणि राणी झाशी यांच्याबरोबर युद्धात असेन आणि हे त्याही वेळी इंग्रजा बरोबरच युती असणार. तुम्ही आता ही अशा लोकांशी युती केली आहे जे 1857 ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाही. ते त्याला सैनिकांचे बंड म्हणतात. ‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार ?’ या प्रश्नामुळं ‘Tamasha Live’  सिनेमाचा  Teaser चर्चेत!   पुढे फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या बायकोत एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही आणि माझी पत्नी ही अशा फालतू टोमण्यांना उतर देणं सोडत नाही. फडणवीसांचं राणा दाम्पत्याच्या जामीनावर भाष्य राज्य सरकारने राजद्रोह लावण्याचा करंटेपणा केला, त्यांना जामीन मिळणारच होता, अशा शब्दात फडणवीसांनी राणा दाम्पत्याला मिळालेल्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात